14 डिसेंबर 2025 रोजी, पाकिस्तानविरुद्धच्या ग्रुप स्टेजच्या सामन्यात, वैभव स्वस्तात बाद झाला, त्याने फक्त 5 रन केल्या. पण, त्याने स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यात यूएईविरुद्ध 171 रनची विक्रमी खेळी खेळली आणि एका डावात सर्वाधिक सिक्स मारण्याचा विश्वविक्रम (14) केला. वैभवने या स्पर्धेत एकूण 235 रन केल्या आहेत, ज्यामुळे तो सर्वाधिक रन करणारा खेळाडू बनला आहे.
advertisement
भारतीय टीम रविवारी आयसीसी अकादमी येथे होणाऱ्या अंडर 19 आशिया कपच्या फायनलमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरेल. आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील भारतीय टीमने स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे, त्यांनी ग्रुप ए मधील त्यांचे सर्व सामने जिंकले आहेत.
शुक्रवारी झालेल्या सेमी फायनलमध्ये भारताने श्रीलंकेला आठ विकेट्सने हरवून फायनल गाठली. दुसरीकडे, पाकिस्तानने गतविजेत्या बांगलादेशला हरवून फायनलमध्ये प्रवेश केला. भारताचा फायनलपर्यंतचा प्रवास त्यांच्या ऑलराऊंड कामगिरीवर अवलंबून आहे, टीम इंडियाचे बॅटर आणि बॉलरनी चमकदार कामगिरी केली आहे. बॅटिंगमध्ये टीम इंडियाने दोन वेळा 400 पेक्षा जास्त रनचा टप्पा गाठला आहे. 17 वर्षीय विकेट कीपर बॅटर अभिज्ञान कुंडू याने रोमांचक कामगिरी केली आहे.
