TRENDING:

'चांदीच्या ताटात पुरणपोळी...'; टॉकरवडीचा झक्कास उखाणा, लग्नाला उरलेत फक्त इतके दिवस

Last Updated:
अभिनेत्री अमता देशमुख आणि प्रसाद जवादे सध्या लगीन घाईत आहेत. लग्नाआधी दोघांच्या केळवणाला सुरूवात झाली आहे.
advertisement
1/8
प्रसाद-अमृताच्या लग्नाला उरले इतके दिवस; घरच्या केळवणाला टॉकरवडीचा झक्कास उखाणा
अभिनेत्री अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे लवकरच लग्न करणार आहेत. काही महिन्यांआधीच दोघांचा साखरपुडा पार पडला.
advertisement
2/8
अमृता प्रसाद यांचे बिग बॉस मराठीमध्ये असताना सुर जुळले. घराबाहेर आल्यानंतर त्यांच्या खऱ्या नात्याची सुरूवात झाली.
advertisement
3/8
दोघेही काही महिने रिलेशनमध्ये होते त्यानंतर अचानक थेट साखरपुड्याचे फोटो शेअर करत दोघांनी त्यांच्या नात्याची कबूली दिली.
advertisement
4/8
दोघांच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. अमृता -प्रसादच्या लग्नाला आता काहीच दिवस शिल्लक राहिलेत.
advertisement
5/8
लग्नाआधीचं केळवण देखील देखील मस्त एन्जॉय करताना दिसत आहे. अमृताच्या आजोबांनी त्यांचं पहिलं केळवण केलं. त्यानंतर आता देशमुख कुटुंबाकडून दोघांचं केळवण करण्यात आलं.
advertisement
6/8
घरच्या केळवणाला अमृतानं प्रसादसाठी खास उखाणा घेत तोंड गोड केलंय. दोघांचे रोमँटीक फोटो देखील तिनं शेअर केलेत.
advertisement
7/8
केळवणाच्या फोटोंसहीत, "चांदीच्या ताटात पुरणपोळी. पुरणपोळीमध्ये जायफळ. प्रसादचं नाव घेतेय देशमुखांचं शेंडेफळ!" , असा झक्कास उखाणा अमृतानं म्हटलाय.
advertisement
8/8
प्रसाद आणि अमृता यांच्या लग्नाला केवळ 25 दिवस बाकी आहेत. 18 नोव्हेंबर 2023 रोजी दोघांचं लग्न होणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'चांदीच्या ताटात पुरणपोळी...'; टॉकरवडीचा झक्कास उखाणा, लग्नाला उरलेत फक्त इतके दिवस
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल