प्राजक्ताचं कन्यादान करणाऱ्या पिंपळकरांची तेजस्विनी लोणारीच्या लग्नालाही हजेरी, अभिनेत्रीच्या आईशी खास नातं
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचं कन्यादार करणारे पिंपळकर अभिनेत्री तेजस्विनी लोणारीच्या लग्नातही हजेरी लावताना दिसले. पिंपळकर यांचं तेजस्विनीच्या आईशी खास नातं आहे.
advertisement
1/9

मराठी मनोरंजन विश्वातील अनेक अभिनेत्रींनी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लग्नागाठ बांधली. त्यातही अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचं लग्न विशेष चर्चेत आलं. प्राजक्ताच्या ग्रँड वेडिंगचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
advertisement
2/9
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने प्रसिद्ध बिझनेसमन शंभुराज खुटवडबरोबर लग्नगाठ बांधली. पुण्यात दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडला. दोघांच्या लग्नाला मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी लग्नाला हजेरी लावली होती.
advertisement
3/9
प्राजक्ता गायकवाडच्या लग्नाला केवळ मनोरंजन विश्वातील कलाकार, अनेक राजकीय आणि समाजिक क्षेत्रातील मंडळींनीही हजेरी लावली होती. प्राजक्ताचे लग्नातील सगळे विधी मोठ्या थाटात पार पडले होते. प्राजक्ताचं कन्यादान विशेष चर्चेत आलं.
advertisement
4/9
आई वडील असतानाही प्राजक्ताचं कन्यादान प्रसिद्ध वास्तूतज्ञ आनंद पिंपळकर यांनी केलं. आनंद पिंपळकर आणि प्राजक्ता यांनी एका सिनेमात एकत्र काम केलं होतं. त्यात प्राजक्ता त्यांची मुलगी होती. ऑनस्क्रिन नातं त्यांनी ऑफस्क्रिन देखील पार पाडलं. त्यांनी प्राजक्ताला लेकीचा दर्जा देऊन तिचं कन्यादान करण्याचं पुण्य मिळवलं.
advertisement
5/9
प्राजक्ताचं कन्यदान करणाऱ्या पिंपळकर यांनी अभिनेत्री तेजश्री लोणारीच्या लग्नालाही हजेरी लावली होती. अभिनेत्री तेजश्री लोणारीनं नुकतंच शिवसेनेचे युवा नेते समाधान सरवणकर यांच्याबरोबर लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
advertisement
6/9
शिवसेनेचे नेते सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर यांच्याबरोबर लग्न करून तेजस्विनी लोणारी ही सरवणकर या राजकीय कुटुंबाची सून झाली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तेजस्विनी आणि समाधान यांच्या लग्नाला हजेरी लावली होती.
advertisement
7/9
पिंपळकर हे देखील तेजस्विनीच्या लग्नात दिसले. पिंपळकर यांचं तेजस्विनीच्या आईशी खास नातं आहे. पिंपळकर यांनी त्यांच्या सोशल मीडियावर तेजस्विनीच्या लग्नातील फोटो आणि व्हिडीओ शेअर केलेत. त्यात त्यांनी तेजस्विनीशी असलेल्या खास नात्याबद्दलही सांगितलं.
advertisement
8/9
तेजस्विनी लोणारीची आई ही पिंपळकर यांची मैत्रीण आहे. तेजस्विनीसोबतही त्यांचं चांगलं नातं आहे. पिंपळकर यांनी तेजस्विनी आणि समाधान यांच्या लग्नाला उपस्थिती लावत त्यांना शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद दिले.
advertisement
9/9
"शिवसेना नेते श्री सदानंद सरवणकर यांचे चिरंजीव समाधान आणि आमची मैत्रीण निलिमा लोणारी यांची कन्या सुप्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी लोणारी यांचा विवाह मुंबई सहारा स्टार या ठिकाणी संपन्न झाला", असं म्हणत पिंपळकर यांनी तेजस्विनी समाधान यांच्या लग्नातील फोटो व्हिडीओ शेअर केलेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
प्राजक्ताचं कन्यादान करणाऱ्या पिंपळकरांची तेजस्विनी लोणारीच्या लग्नालाही हजेरी, अभिनेत्रीच्या आईशी खास नातं