TRENDING:

Sayali Sanjeev : सायली संजीवची वयाच्या 32 व्या वर्षी राजकारणात एन्ट्री? स्पष्टच म्हणाली, 'राज ठाकरे माझ्यासाठी...'

Last Updated:
Sayali Sanjeev : मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सायली संजीव सध्या आपल्या आगामी 'कैरी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान सायलीने राजकारणातील एन्ट्रीबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
advertisement
1/7
सायली संजीवची वयाच्या 32 व्या वर्षी राजकारणात एन्ट्री? म्हणाली...
मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सायली संजीव सध्या आपल्या आगामी 'कैरी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 12 डिसेंबर 2025 रोजी हा बहुचर्चित चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सायली संजीवने राजकारणातील एन्ट्रीबाबत भाष्य केलं आहे.
advertisement
2/7
सायली संजीव राज्यशास्त्राची विद्यार्थीनी आहे. तसेच ती मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मोठी फॅन आहे. त्यांचे विचार तिला पटतात. अनेकदा मराठी भाषेबाबत बोलताना सायली दिसून आली आहे.
advertisement
3/7
'तरुण भारत'ला दिलेल्या मुलाखतीत सायली संजीव म्हणाली,"2009 पासून मला राजकारणाची गोडी निर्माण झाली आहे. राज साहेबांनी मनसेची स्थापना केली त्यावेळी मी वाढत्या वयात होते. माझ्या वाढत्या वयात मी त्यांची भाषणे ऐकली. त्यामुळे माझ्यावर त्यांचा खूप जास्त प्रभाव पडला आहे. राज ठाकरेंची मी फॅन आहे. मला त्यांच्यासोबत गप्पा मारायला खूप आवडतात. कलाक्षेत्रासह इतर सर्वच क्षेत्रांबाबत त्यांना खूप माहिती असतं. राज ठाकरे हे एक उत्तम वाचक आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबतच्या गप्पांमधून मला खूप ज्ञान मिळतं".
advertisement
4/7
मराठी भाषेबाबत बोलताना सायली संजीव म्हणाली,"आपल्या भाषेचा, आपल्या संस्कृतीचा आपण मान ठेवला तर बाकीचे लोक मान ठेवतील. आपण समोरच्या व्यक्तीसोबत त्याच्या भाषेतच आधी बोलायला लागलो तर आपली भाषा कोणाला कळणार नाही. आपली भाषा टिकवणं ही आपली स्वत:ची जबाबदारी आहे. आपण स्वत: पासून याची सुरुवात केली पाहिजे".
advertisement
5/7
सायली संजीव राजकारणात एन्ट्री करणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. सायली आता राजकारणात एन्ट्री करण्याबाबत म्हणाली,"अजून असं काही ठरवलेलं नाही. मला राजकीय विश्लेषक म्हणून काम करायला खूप आवडेल. मला एखाद्या पक्षात सक्रीय काम करत राहण्यापेक्षा मला संपूर्ण राजकारणाचं विश्लेषण करायला फार मजा येईल".
advertisement
6/7
सायली संजीव मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'काहे दिया परदेस' या मालिकेच्या माध्यमातून तिने मराठी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर अनेक दर्जेदार चित्रपटांच्या माध्यमातून सायली संजीव प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
advertisement
7/7
सायली संजीव पोलिस लाईन, आटपाडी नाईट्स, मन फकीरा, सातारचा सलमान, एबी आणि सीडी, झिम्मा, गोष्ट एका पैठणीची, बस्ता, काहे दिया परदेस, गुलमोहर, परफेक्ट पती आणि शुभमंगल ऑनलाईन असे अनेक चित्रपट आणि मालिका प्रेक्षकांच्या प्रदर्शित झाल्या आहेत. आता तिच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Sayali Sanjeev : सायली संजीवची वयाच्या 32 व्या वर्षी राजकारणात एन्ट्री? स्पष्टच म्हणाली, 'राज ठाकरे माझ्यासाठी...'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल