TRENDING:

Numerology: दिनांक 4, 13, 22, 31 या तारखांचा जन्म आहे? नवीन वर्षात मिळणार मोठं घबाड, पैसा कशात

Last Updated:
New Year Horoscope 2026 Mulank 4: बघता-बघता नवीन वर्ष 2026 सुरू होईल. अंकशास्त्रानुसार मूलांक 4 असणाऱ्यांसाठी हे वर्ष काही नवीन संधी घेऊन येणार आहे. 2025 च्या तुलनेत 2026 हे वर्ष मूलांक 4 साठी थोडंसं मिश्र राहील, पण काही चांगल्या गोष्टीही आयुष्यात घडतील. नवीन वर्षात नवी नोकरी मिळेल का? करिअरमध्ये स्थैर्य राहील का? आर्थिक स्थिती, आरोग्य, नातेसंबंध कसे राहतील? असे प्रश्न आपल्या अनेकांच्या मनात असतात. अंकशास्त्राद्वारे येणारं नवीन वर्ष मूलांक 4 असणाऱ्या लोकांना कसं असेल, त्याविषयी जाणून घेऊ.
advertisement
1/6
दिनांक 4 13 22 31 या तारखांचा जन्म आहे? नवीन वर्षात मिळणार मोठं घबाड, पैसा कशात
मूलांक 4 साठी 2026 कसं?अंकज्योतिषानुसार 2026 या वर्षाचा स्वामी सूर्य आहे. वर्षभर सूर्याचा प्रभाव जाणवेल. मूलांक 4 चा स्वामी राहु आहे. ज्यांचा जन्म 4, 13, 22 किंवा 31 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक 4 असतो. नवीन वर्ष तुमच्यासाठी थोडं चढ-उताराचं असेल, पण गेल्या वर्षापेक्षा परिस्थिती सुधारताना दिसेल.
advertisement
2/6
करिअरमध्ये यश - करिअरच्या बाबतीत हे वर्ष चांगलं आहे. ऑफिसमध्ये तुमचं काम कौतुकास्पद राहील, बॉसही तुमच्यावर खुश राहतील. त्यामुळे नोकरीत स्थैर्य आणि प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. काही नवीन संधी मिळण्याचीही शक्यता आहे. 
advertisement
3/6
व्यवसाय करणाऱ्यांना नवीन डील मिळू शकतात. अशा संधींना पुढे होऊन पकडणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. या वर्षी पार्टनरशिपचे प्रस्तावही येऊ शकतात. परिस्थिती नीट समजून निर्णय घ्या. पार्टनरशी काही मतभेद असतील तर शांतपणे बोलून ते सोडवा. करिअरच्या दृष्टीने 2026 सकारात्मक बदल देणारे वर्ष ठरू शकते. संधी मिळाली तर ती लगेच पकडा. मेहनतीनुसार उत्तम परिणाम मिळतील. शिक्षण व स्पर्धा परीक्षांसाठीही हे वर्ष अनुकूल आहे.
advertisement
4/6
कौंटुंबिक जीवन - कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. परिवारासोबत फिरायला जाण्याचे योग आहेत. मित्रमैत्रिणींना वेळ देता येईल. ज्यांचा विवाह झाला नाही, त्यांच्यासाठी हे वर्ष शुभ आहे. लग्नाचे चांगले प्रस्ताव येतील. लव्ह रिलेशनमध्ये असणाऱ्यांना त्यांच्या नात्याला विवाहात रूपांतर करण्याची इच्छा होईल. वर्षभरात नवीन लोक भेटतील आणि त्यांच्या विचारांचा तुमच्यावर प्रभाव पडू शकतो.
advertisement
5/6
मूलांक 4 असणाऱ्यांचे अनेक गुप्त शत्रू असतात, ते वेळोवेळी त्रास देतात. नवीन वर्षात शत्रूंना हलक्यात घेऊ नका. तुमच्या योजना, कामं, महत्वाच्या गोष्टी गुप्त ठेवा. नजिकचा माणूसही त्रास देऊ शकतो, त्यामुळे कोणावरही अवाजवी विश्वास ठेवू नका. या वर्षी आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. वेळोवेळी हेल्थ चेकअप करून घ्या. योग, प्राणायाम आणि व्यायाम करण्याची सवय लावा.
advertisement
6/6
नवीन वर्षात मूलांक 4 ने काय टाळावे -अतिआत्मविश्वास टाळा, नाहीतर नुकसान होऊ शकते. घाईगडबडीत कोणताच निर्णय घेऊ नका. चुकीचे निर्णय त्रास देऊ शकतात. नीट विचार करून किंवा विश्वासू लोकांचा सल्ला घेऊनच निर्णय घ्या. रागाच्या भरात तुम्ही कधी कधी कठोर शब्द बोलता. 2026 मध्ये वाणीवर संयम ठेवणं फार महत्त्वाचं आहे. संयम आणि शांतता तुमच्यासाठी शुभ ठरेल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Numerology: दिनांक 4, 13, 22, 31 या तारखांचा जन्म आहे? नवीन वर्षात मिळणार मोठं घबाड, पैसा कशात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल