बोंबला! Indigo Flight रद्द, नवरा-नवरी अडकले; रिसेप्शनला पोहोचण्यासाठी लढवली भारी शक्कल
- Published by:Priya Lad
Last Updated:
Indigo Flight Couple Attend Online Wedding Reception : देशातील प्रमुख विमान कंपनी असलेल्या इंडिगोच्या व्यवस्थापनात आलेलं संकट कायम आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल काही थांबले नाहीत. याचा फटका एका नवविवाहित दाम्पत्यालाही बसला.
advertisement
1/5

दररोज सुमारे 3.8 लाख प्रवाशांना सेवा देणारी देशातील सर्वात मोठी एअरलाइन कंपनी इंडिगोला मागील काही दिवसांपासून गंभीर समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. याचा फटका एका नवविवाहित दाम्पत्यालाही बसला.
advertisement
2/5
मेघा क्षीरसागर आणि संगम दास हे कपल. बंगळुरूतील सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम करणारी हुबळीची मेघा आणि भुवनेश्वरचा संगम यांचं लग्न 23 नोव्हेंबर रोजी झालं.
advertisement
3/5
हुबळीमध्ये त्याच्या लग्नाचा रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता. 2 डिसेंबर रोजी भुवनेश्वरहून बंगळुरू मार्गे हुबळीला पोहोचण्यासाठी मेघा आणि संगम यांनी कनेक्टिंग फ्लाईट बुक केली होती. पण फ्लाइट रद्द झाली आणि हे नवविवाहित कपल भुवनेश्वरमध्येच अडकलं. त्यामुळे हुबळीतील नियोजित रिसेप्शनमध्ये ते पोहोचलेच नाही.
advertisement
4/5
पण रिसेप्शन सोहळ्याचं आमंत्रण सगळ्यांना गेलं होतं, त्यानुसार नातेवाईक, मित्रमंडळी हुबळीतील गुजरात भवन इथं जमा व्हायला सुरुवात झाली. मेघाच्या कुटुंबीयांनी या परिस्थितीत एक अनोखा मार्ग काढला.
advertisement
5/5
त्यांनी मेघा आणि संगम यांना व्हिडिओ कॉलद्वारे सोहळ्यात सहभागी करून घेतलं. मोठ्या स्क्रीनवर पाहुण्यांनी त्यांचं स्वागत केलं आणि जोडप्याने हसून सर्वांशी संवाद साधला. (सर्व फोटो : सोशल मीडिया व्हिडीओ ग्रॅब)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
बोंबला! Indigo Flight रद्द, नवरा-नवरी अडकले; रिसेप्शनला पोहोचण्यासाठी लढवली भारी शक्कल