मोहम्मद शमी कुठंय? तिसर्या वनडेआधी हरभजन सिंगचा पारा चढला, LIVE कॉमेन्ट्रीमध्ये आगरकरची घेतली शाळा!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Harbhajan Singh On Mohammed Shami : भारतीय संघाचा माजी अनुभवी फिरकी गोलंदाज हरभजन सिंग याने वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला सतत राष्ट्रीय संघातून बाहेर ठेवण्यावर थेट प्रश्न उपस्थित केला आहे.
advertisement
1/7

मोहम्मद शमी शेवटचा मार्च 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद विजेतेपद चषक स्पर्धेत (Champions Trophy) भारताकडून खेळला होता आणि त्यानंतर त्याची कोणत्याही भारतीय संघात निवड झाली नाही.
advertisement
2/7
35 वर्षांचा हा गोलंदाज सध्या सैयद मुश्ताक अली चषक स्पर्धेत बंगालकडून खेळत असून, स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली खेळी करूनही त्याला साऊथ अफ्रिकाविरुद्ध परत बोलवलं नाही. या पार्श्वभूमीवर, हरभजनने भारतीय संघाला महत्त्वाचा सल्ला दिलाय.
advertisement
3/7
जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीतही सामना जिंकण्याची कला शिकण्याचा महत्त्वाचा सल्ला हरभजन सिंगने टीम इंडियाला दिला आहे. शमी कुठे आहे? शमी का खेळत नाहीये, मला माहीत नाही, असं हरभजन सिंग म्हणाला.
advertisement
4/7
विराट आणि रोहितचं भविष्य असे लोक ठरवत आहेत ज्यांनी स्वतः क्रिकेटमध्ये काहीही विशेष साध्य केलेलं नाही. हे माझ्यासोबत आणि माझ्या अनेक सहकाऱ्यांसोबत घडले, जे दुर्दैवी आहे, असंही हरभजन सिंग म्हणाला आहे.
advertisement
5/7
ठीक आहे, तुमच्याकडे प्रसिद्ध कृष्णासारखे चांगले गोलंदाज आहेत, पण त्यांना अजून खूप काही शिकायचे आहे. तुमच्याकडे जे चांगले गोलंदाज आहेत, त्यांना तुम्ही हळूहळू बाजूला केलं आहे, असंही भज्जी म्हणाला.
advertisement
6/7
आपल्याला जसप्रीत बुमराहशिवायही सामना जिंकण्याची कला शिकावी लागेल. इंग्लंडमध्ये बुमराह नसताना मोहम्मद सिराज अविश्वसनीय, उत्कृष्ट होता. बुमराह न खेळलेले सर्व कसोटी सामने भारताने जिंकले आहेत.
advertisement
7/7
आपल्याला कुठंतरी असे खेळाडू शोधावे लागतील, जे तुम्हाला सामना जिंकवून देऊ शकतील, मग ती वेगवान गोलंदाजी असो वा फिरकी. एक-दोन असे फिरकीपटू आणा, जे येऊन विकेट घेऊ शकतील. कुलदीप यादव आहे, पण बाकीचे काय? असा सवाल देखील हरभजनने विचारला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
मोहम्मद शमी कुठंय? तिसर्या वनडेआधी हरभजन सिंगचा पारा चढला, LIVE कॉमेन्ट्रीमध्ये आगरकरची घेतली शाळा!