काळ आला होता, वेळ नाही! 45 टाके, हाताला प्लास्टर; विकी जैनचा भयानक अपघात, मित्राने सांगितलं नेमकं काय घडलं
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Vicky Jain Accident : विकी जैनचा गंभीर अपघात झाला असून त्याच्या हाताला ४५ टाके पडले. त्याच्या मित्राने याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
advertisement
1/6

अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत असतात. बिग बॉस १८ मधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या विकीला आता कोणत्याही परिचयाची गरज नाही.
advertisement
2/6
अंकिता आणि विकी गेल्या काही महिन्यांपासून लाफ्टर शेफ या कार्यक्रमाचा भाग आहेत. या शोमधून ते त्यांच्या चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसतात. चाहतेही या जोडीवर भरभरून प्रेम करतात. अशातच विकीचे हॉस्पिटलमधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्याच्या चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला.
advertisement
3/6
विकीच्या या फोटोंमध्ये त्याच्या एका हाताला सलाइन, तर दुसऱ्या हाताला फ्रॅक्चर झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी त्याच्या आजूबाजूला त्याच्या कुटुंबातील मंडळी आणि अंकिताही होती. विकीचे फोटो पाहून त्याला गंभीर दुखापत झाली आहे, हे लक्षात येत होतं, पण त्याच्यासोबत नेमकं काय घडलंय याबाबत कोणालाही कल्पना नव्हती.
advertisement
4/6
अशातच विकीच्या मित्राने त्याचे हॉस्पिटलमधील आणखी काही फोटो शेअर करत त्याच्यासोबत नेमकं काय घडलं हे सविस्तर सांगितलं आहे. संदीप सिंहने शेअर केलेल्या पोस्टनुसार विकीचा गंभीर अपघात झाला असून त्याला मोठ्या प्रमाणावर दुखापत झाली आहे.
advertisement
5/6
"एका भयंकर अपघातात विकीच्या हातात काचेचे अनेक तुकडे घुसले. त्याच्या हाताला तब्बल ४५ टाके पडले असून गेल्या तीन दिवसांपासून तो हॉस्पिटलमध्ये आहे. इतक्या भयानक अपघातानंतरही तो आम्हाला हसवतोय, जसं काही घडलंच नाहीये." असं संदीपनं म्हटलंय.
advertisement
6/6
यानंतर संदीपने अंकिताचंही मनभरून कौतुक केलं. त्याने लिहिलं, "गेल्या ७२ तासांपासून तू विकीची काळजी घेत आहे. तू सुपरवुमनपेक्षा कमी नाहीयेस. तुझं तुझ्या नवऱ्यावरचं प्रेम त्याच्यासाठी सर्वकाही आहे, तेच त्याचं बळ आहे." दरम्यान, संदीपची ही पोस्ट तुफान व्हायरल झाली असून चाहते विकीची तब्येत लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
काळ आला होता, वेळ नाही! 45 टाके, हाताला प्लास्टर; विकी जैनचा भयानक अपघात, मित्राने सांगितलं नेमकं काय घडलं