Apurva Nemlekar : लगीन झालो पण नाईकांना इसरली नाय! नवऱ्याला घेऊन वाड्यावर पोहोचली शेवंता! PHOTO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिनं नुकतंच लग्न केलं. लग्नानंतर ती नवऱ्याला घेऊन थेट आण्णा नाईकांच्या वाड्यावर पोहोचली.
advertisement
1/8

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिनं नुकतंच लग्न केलं. अपूर्वाने तिच्या प्रेमाला दुसरा चान्स देत दुसऱ्यांदा लग्न करायचं ठरवलं. लग्नानंतर अपूर्वा नवऱ्याबरोबर गोव्याला गेली आहे. दोघेही सध्या व्हेकेशन मोडवर आहेत.
advertisement
2/8
अपूर्वाने तनुज गोवळकरबरोबर लग्न केलं. लग्नानंतर दोघांची धम्माल मस्ती ती सोशल मीडियावर शेअर करत असते. चाहत्यांकडून अपूर्वा आणि तनुज यांनी खूप प्रेम आणि आशीर्वाद मिळत असतात.
advertisement
3/8
दरम्यान गोव्याला फिरायला गेलेल्या अपूर्वानं नवऱ्याला थेट आण्णा नाईकांच्या वाड्यावर नेलं. शेवंताला पुन्हा एकदा नाईकांच्या वाड्यावर पाहून चाहत्यांनी मात्र आनंद व्यक्त केला आहे.
advertisement
4/8
आण्णा नाईकांचा वाडा म्हणजे रात्रीस खेळ चाले मालिकेचा सेट. कोकणातील सावंतवाडी येथील खऱ्या वाड्यात या मालिकेचं शूटींग करण्यात आलं होतं. एका नाही तर या मालिकेचे तीन सीझन प्रेक्षकांच्या भेटीस आले.
advertisement
5/8
रात्रीस खेळ मालिकेच्या दुसऱ्या सीझन आण्णा आणि शेवंता यांची लव्ह स्टोरी दाखवण्यात आली होती. शेवंता हे पात्र अपूर्वाने साकारलं होतं. ज्यामुळे तो घराघरात लोकप्रिय झाली. लग्नानंतर अपूर्वाने नवरा तनुजला आण्णांचा वाडा पाहायला नेलं.
advertisement
6/8
"काळजी करू नका मित्रांनो तो इथे अण्णांना शोधायला आलेला नाही", असं मजेशीर कॅप्शन देत अपूर्वाने नवऱ्याबरोबर आण्णा नाईकांच्या वाड्याबाहरे काढलेले फोटो शेअर केलेत. या फोटोंच्या निमित्तानं प्रेक्षकांच्या मालिकेप्रती आणि शेवंताच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या.
advertisement
7/8
अपूर्वाने ही मालिका अर्ध्यातच सोडली होती. मुंबईतून कोकणातील प्रवास आणि विनाकारण सेटवर झालेल्या खोळंब्याला कंटाळून अपूर्वाने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता. या मालिकेसाठी तिने तिचं वजन देखील वाढवलं होतं. शेवंता या पात्राला तिने पुरेपूर न्याय दिला.
advertisement
8/8
रात्रीस खेळ चाले या मालिकेतील सगळीच पात्र एकाहून एक हटके होती. त्यातील शेवंत आणि आण्णा या पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान मिळवलं. आजही अपूर्वाला शेवंता या नावाने ओळखलं जातं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Apurva Nemlekar : लगीन झालो पण नाईकांना इसरली नाय! नवऱ्याला घेऊन वाड्यावर पोहोचली शेवंता! PHOTO