TRENDING:

'भारतीय असल्याचा अभिमान...', वादानंतर अखेर A R Rahman ने सोडलं मौन, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Last Updated:
AR Rahman on Controversy : ए. आर. रहमान सध्या चर्चेत आहेत. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी बॉलिवूडविषयी काही वादग्रस्त वक्तव्ये केली होती. ज्यात त्यांनी इंडस्ट्रीत सांप्रदायिकता वाढत असल्याचे म्हटले होते. या वक्तव्यांमुळे मोठा वाद निर्माण झाला असून, त्यानंतर रहमान यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत आपली बाजू मांडली आहे.
advertisement
1/7
'भारतीय असल्याचा अभिमान...', वादानंतर अखेर A R Rahman ने सोडलं मौन
ऑस्कर आणि गोल्डन ग्लोबसारखे पुरस्कार जिंकणारे दिग्गज संगीतकार ए. आर. रहमान सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी बॉलिवूडमध्ये कमी काम करण्यामागची काही कारणे सांगितली होती. त्यांनी इंडस्ट्रीमध्ये सांप्रदायिक भावना वाढत असल्याचेही म्हटले होते.
advertisement
2/7
ए. आर. रहमान यांच्यामते, हळूहळू चित्रपट आणि संगीतविश्वावर सांप्रदायिकतेचा प्रभाव वाढताना दिसत आहे आणि त्याचा परिणाम त्यांच्या कामावरही होत आहे. त्यांच्या या वक्तव्यांवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. दरम्यान ए. आर. रहमान यांनी या प्रकरणावर मौन सोडले आहे.
advertisement
3/7
ए. आर. रहमान यांनी काही दिवसांपूर्वी बीबीसी एशियनला दिलेल्या मुलाखतीत इंडस्ट्रीबाबत ही टिप्पणी केली होती. त्यांनी विकी कौशल अभिनीत ‘छावा’ या चित्रपटाला फूट पाडणारा सिनेमा असल्याचं म्हटलं होतं.
advertisement
4/7
फुटिरतावादानंतर ए. आर. रहमान यांनी एक व्हिडीओ शेअर करत कोणालाही दुखावण्याचा त्यांचा हेतू नसल्याचं स्पष्ट केलं आहे. कदाचित त्यांच्या बोलण्याचा अर्थ चुकीचा लावला गेला. ज्या भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्या देशाचा नागरिक असल्याचा त्यांना अभिमान आहे.
advertisement
5/7
ए. आर. रहमान म्हणाले, “माझा उद्देश कधीही कोणाला दुखावण्याचा किंवा द्वेष पसरवण्याचा नव्हता. मी एक संगीतकार आहे आणि माझे काम लोकांना जोडणे आहे, विभक्त करणे नाही. मी फक्त माझा अनुभव शेअर केला. माझ्या स्वभावात द्वेष नाही आणि मी नेहमीच एकतेचा समर्थक राहिलो आहे.”
advertisement
6/7
ए. आर. रहमान पुढे म्हणाले की कधी कधी हेतूंचा गैरसमज होऊ शकतो, पण त्यांचा उद्देश नेहमीच संगीताच्या माध्यमातून सेवा करण्याचा राहिला आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे, “संगीत, संस्कृती, कृतज्ञता. ज्या कलेने आणि मातीतून मला घडवले, त्याच्या सेवेत सदैव.”
advertisement
7/7
रणबीर कपूर अभिनीत ‘रामायण’ या चित्रपटासाठी संगीत तयार करण्याची संधी मिळणे ही अभिमान आणि सन्मानाची बाब असल्याचे ए. आर. रहमान यांनी सांगितले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'भारतीय असल्याचा अभिमान...', वादानंतर अखेर A R Rahman ने सोडलं मौन, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल