TRENDING:

प्रसिद्ध गायकाची तब्येत बिघडली, रुग्णालयातील PHOTO समोर, दिसला या अवस्थेत

Last Updated:
Famous Singer Hospitalized : प्रसिद्ध गायकाची तब्येत बिघडली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
advertisement
1/7
प्रसिद्ध गायकाची तब्येत बिघडली, रुग्णालयातील PHOTO समोर
प्रसिद्ध गायक अरमान मलिकची तब्येत बिघडली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
advertisement
2/7
अरमान मलिकचा रुग्णालयातील फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सध्या तो रुग्णालयात उपचार घेत आहेत.
advertisement
3/7
अरमान मलिकने रुग्णालयातील फोटो शेअर करत चाहत्यांना हेल्थ अपडेट दिली आहे. मात्र रुग्णालयात दाखल होण्यामागचं नेमकं कारण त्यांने स्पष्ट केलेलं नाही. अरमानने सांगितले की गेल्या काही दिवसांपासून त्याची तब्येत ठीक नव्हती आणि त्यामुळेच त्याला रुग्णालयात दाखल व्हावे लागले.
advertisement
4/7
अरमान मलिकने स्वतः रुग्णालयातील एक फोटो शेअर केला असून त्यामुळे आता चाहत्यांची चिंता वाढली आहे. फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, “गेले काही दिवस चांगले गेले नाहीत".
advertisement
5/7
चाहत्यांची चिंता वाढल्याने अरमानने चाहत्यांना आश्वस्त केले की आता त्याच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. त्याने पुढे सांगितले की तो विश्रांती घेत आहे आणि हळूहळू त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. अरमान मलिकने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याच्या हाताला आयव्ही ड्रिप लागलेली दिसते.
advertisement
6/7
अरमान मलिकचा फोटो शेअर होताच चाहत्यांनी चिंता व्यक्त करायला सुरुवात केली. एका चाहत्याने कमेंटमध्ये लिहिले, “लवकर बरे व्हा.” तर दुसऱ्याने विचारले, “तुम्ही रुग्णालयात का दाखल आहात, काय झाले?” अशा अनेक कमेंट्स करत नेटकरी त्याच्या आरोग्याबद्दल चिंता व्यक्त करत लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.
advertisement
7/7
अरमान मलिक काही दिवसांपूर्वी चर्चेत आला होता. भाऊ अमाल मलिकसोबत तुलना करू नका, असं त्याने म्हटलं होतं. गायकाने एक सविस्तर पोस्ट शेअर करत लिहिले होते,“काही लोक मला आणि अमालला एकमेकांविरुद्ध उभे करण्याचा प्रयत्न का करतात, हे मला खरोखर समजत नाही. आमचे मार्ग वेगळे असले तरी एकमेकांना पुढे जाताना आणि यशस्वी होताना पाहण्यातच आमचा आनंद आहे. कृपया आमची तुलना करणे थांबवा. आम्ही यापेक्षा खूप मोठे आहोत.”
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
प्रसिद्ध गायकाची तब्येत बिघडली, रुग्णालयातील PHOTO समोर, दिसला या अवस्थेत
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल