23 वर्ष लिव्ह-इन वयाची चाळीशी ओलांडताच लग्न, TV च्या फेमस कपलने अखेर थाटला संसार
- Published by:Minal Gurav
Last Updated:
टेलिव्हिजनच्या फेमस कपलने अखेर लग्न करण्याचा निर्णय घेतला. 23 वर्ष लिव्ह-इनमध्ये राहिल्यानंतर आता वयाच्या चाळीशी ओलांडल्यानंतर दोघांनी लग्न केलं. लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
advertisement
1/8

मराठी इंडस्ट्रीत अनेक कलाकारांनी लग्न केली. अशातच आणखी एका मराठी अभिनेत्रीचं लग्न झालं आहे. 23 वर्ष लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर अभिनेत्रीनं लग्न करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
2/8
'क्योंकी सास भी कभी बहू थी' फेम अभिनेत्री अश्लेषा सावंत हिनं लग्न केलं आहे. 23 वर्षा अभिनेता संदीप बसवानाबरोबर ती लिव्ह इनमध्ये राहत होती. अखेर 23 वर्षांनी दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
advertisement
3/8
अश्लेषा सावंत आणि संदीर बसवाना यांनी 16 नोव्हेंबर 2025 रोजी वृंदावनमधील चंद्रोदय मंदिरात लग्न केले. त्यांच्या लग्नाला फक्त जवळचे कुटुंबीय आणि मित्र मंडळी उपस्थित होते.
advertisement
4/8
संदीपने आपल्या लग्नाबद्दल बोलताना सांगितले की, "अश्लेषा आणि मी एप्रिलमध्ये वृंदावनला गेलो होतो आणि तिथली राधाकृष्ण मंदिरे पाहणे हा एक अनोखा अनुभव होता. आम्हाला तिथे एक खोल नातं जाणवलं. यामुळे आम्हाला 23 वर्षांनंतर लग्न करण्याबद्दल विचार करण्याची संधी मिळाली आणि आमचे कुटुंब बऱ्याच काळापासून या क्षणाची वाट पाहत होते. आम्हाला लग्न खूप साधेपणाने करायचे होते."
advertisement
5/8
'क्योंकी सास भी कभी बहू थी' मध्ये दिसलेला संदीप बसवाना यांनी ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत इतके दिवस लग्न न करण्याचे खरे कारण सांगितले. दोघांमध्ये वयाचा मोठा फरक आहे. अभिनेत्री अश्लेषा सावंत 41 वर्षांची आहे तर संदीप 47 वर्षांचा आबे. दोघांमध्ये 6 वर्षांचं अंतर आहे.
advertisement
6/8
"आणि अशाच प्रकारे आम्ही आयुष्याच्या एका नव्या चॅप्टरमध्ये प्रवेश केला आहे. मिस्टर अँड मिसेस.... परंपरेने आमच्या हृदयात स्थान मिळवले आहे", असं कॅप्शन देत अश्लेषा आणि संदीप यांनी लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.
advertisement
7/8
अभिनेत्री अश्लेषा सावंतनेही तिच्या लग्नाबद्दल आनंद व्यक्त केला आणि म्हटले की, वृंदावन हे त्यांच्या लग्नासाठी योग्य ठिकाण होते. आम्ही तिथे पोहोचताच अचानक लग्न करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
8/8
लग्नासाठी दोघांनी अत्यंत साधे आऊटफिट निवडले होते. अश्लेषाने पिंक कलरची साडी, डोक्यावर पदर घेतला होता. तर संदीपही पिंक कलरच्या शेरवानीमध्ये दिसला. दोघांनी लग्न केल्याचं कळताच चाहत्यांनीही आनंद व्यक्त केला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
23 वर्ष लिव्ह-इन वयाची चाळीशी ओलांडताच लग्न, TV च्या फेमस कपलने अखेर थाटला संसार