TRENDING:

Guess Who : 15 व्या वर्षी डेब्यू, काही वर्षात इंडस्ट्रीला रामराम; 40 व्या वर्षी 1300 कोटींची मालकीन आहे ही अभिनेत्री

Last Updated:
Actress Net Worth : वयाच्या 15 व्या वर्षी इंडस्ट्रीत पदार्पण करणारी अभिनेत्री आजच्या घडीला 1300 कोटींची मालकीन आहे. विशेष म्हणजे खूप वर्षांपूर्वीच अभिनेत्रीने इंडस्ट्रीला राम राम केला होता.
advertisement
1/11
Guess Who : 40 व्या वर्षी 1300 कोटींची मालकीन आहे ही अभिनेत्री
इंडस्ट्री गाजवणाऱ्या अनेक अभिनेत्री आजच्या घडीला गायब आहेत. लग्न, संसार, मुलं आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे या अभिनेत्रींनी इंडस्ट्रीला राम राम केलंय. पण तरीही या अभिनेत्रींचा मोठा चाहतावर्ग असून त्यांच्या कामाचं कौतुक होत असतं. अशाचपद्धतीने वयाच्या 15 व्या वर्षी इंडस्ट्रीत पदार्पण करणारी एक अभिनेत्री आजच्या घडीला 1300 कोटींची मालकीन आहे.
advertisement
2/11
अभिनेत्री असिन थोत्तुन्कलने नुकताच आपला 40 वा वाढदिवस साजरा केला. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी तिने अनेक साऊथ चित्रपटांत आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. आपल्या लक्षवेधी भूमिकांच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. तिचे सर्व चित्रपट हिट ठरले.
advertisement
3/11
कोच्चीतील कॅथलिक कुटुंबात जन्मलेल्या असिनचे आई-वडील CBI ऑफिसर आणि डॉक्टर आहेत. कोच्चीत शिक्षण पूर्ण केलेल्या असिनची तमिळ, तेलगू, इंग्रजी, संस्कृत, मलयाळम, फ्रेंच आणि हिंदी या भाषांवर पकड आहे.
advertisement
4/11
कुंचाको बॉबन मुख्य भूमिकेत असलेल्या, 2001 मध्ये आलेल्या सत्यन अंतिक्काट दिग्दर्शित ‘नरेन्द्रन मखन जयकांतन वक’ या चित्रपटाच्या माध्यमातून असिनने वयाच्या 15 व्या वर्षी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर असिनने तेलगू चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली.
advertisement
5/11
असिनने 2004 मध्ये आलेल्या 'जय रवी' या चित्रपटाच्या माध्यमातून तमिळ सिनेसृष्टीत पदार्पण केलं. यात असिन रवि मोहकसोबत स्क्रीन शेअर करताना दिसली. त्यानंतर प्रभाससोबत 'चकрам’ या तेलुगू चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसली. पण ‘उल्लम केत्तिकुमे’ या चित्रपटाने तिला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली.
advertisement
6/11
सूर्यच्या ‘गजिनी’, ‘वेल’; विक्रमच्या ‘माजा’; विजयच्या ‘शिवकासी’, ‘पोकीरी’; अजितच्या ‘वरलारु’, ‘आळवार’ अशा चित्रपटांनी असिनला तमिळ प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री बनवले.
advertisement
7/11
कमल हासनसोबत मुख्य भूमिकेत असलेल्या ‘दशावतार’ आणि विजयच्या चित्रपट ‘कावलेन’ यांसारख्या चित्रपटांनी असिनला तमिळ चित्रपटसृष्टीतील लक्षवेधी तारा म्हणून ओळख मिळाली.
advertisement
8/11
कावलेन नंतर असिनने आपले लक्ष पूर्णपणे बॉलिवूडकडे केंद्रित केले. ‘गजिनी’, ‘रेडी’, ‘हाउसफुल 2’, ‘बोल बच्चन’, ‘खिलाड़ी 786’ या चित्रपटांनी असिनला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. तिने सलमान खान, आमिर खान, अभिषेक बच्चन, अजय देवगण, अक्षय कुमार यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली.
advertisement
9/11
असिनने चित्रपटसृष्टीतून पूर्णपणे दूर जाण्यास सुरुवात केल्याला आता 10 वर्षे झाली आहेत. 2015 मधील ‘ऑल इज वेल’ हा तिचा शेवटचा चित्रपट होता.
advertisement
10/11
आपल्या 14 वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत असिनने 25 चित्रपटांमध्ये अभिनय केला. प्रसिद्ध उद्योगपती राहुल शर्मा हे असिनचे पती आहेत. राहुल शर्मा हे मायक्रोमॅक्स या मोबाइल फोन निर्मिती कंपनीचे सह-संस्थापक आहेत. विवाहानंतर असिनने चित्रपटसृष्टीला रामराम करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
11/11
असिनच्या एकूण संपत्ती 1300 कोटी रुपयांच्या आसपास आहे. असिन आणि राहुलला अरिन नावाची एक मुलगी आहे. असिन आपल्या कुटुंबासोबत मुंबईत राहते. कधी कधी ती आपल्या मुलीसोबत कोच्चीतील आपल्या घरीदेखील जात असते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Guess Who : 15 व्या वर्षी डेब्यू, काही वर्षात इंडस्ट्रीला रामराम; 40 व्या वर्षी 1300 कोटींची मालकीन आहे ही अभिनेत्री
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल