TOP 10 मध्ये पोहोचण्याआधीच दाखवला बाहेरचा रस्ता, रितेश देशमुखने सुनावला अंतिम निर्णय, पाहा कोण आलं घराबाहेर?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Eviction : रितेश देशमुखने भाऊच्या धक्क्यावर १० व्या आठवड्यात घराबाहेर पडणाऱ्या स्पर्धकाचे नाव जाहीर केले आणि प्रेक्षकांसह घरातील सदस्यांनाही धक्का बसला आहे.
advertisement
1/9

मुंबई : बिग बॉस मराठीचा खेळ आता अंतिम टप्प्याच्या जवळ पोहोचला आहे. अशातच आता घरातील स्पर्धकांमध्ये तगडी स्पर्धा पाहायला मिळत आहे. मागच्या सीझन प्रमाणेच सध्याचा सीझनही चांगलाच गाजत आहे.
advertisement
2/9
प्रत्येक स्पर्धक पुढे जाण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करताना दिसत आहे. अशातच आजच्या भाऊच्या धक्क्यावर १० व्या आठवड्यात कोण घराबाहेर पडणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.
advertisement
3/9
प्रभू शेळके, सागर कारंडे, दिपाली सय्यद, विशाल कोटियन, रेवा कौरसे, राकेश बापट आणि संस्कृती साळुंखे या स्पर्धकांवर या आठवड्यात नॉमिनेशनची टांगती तलवार होती. दरम्यान, सोशल मीडिया ट्रेंडवर सातत्याने वोटिंमध्ये बदल होताना दिसत होते, त्यामुळे प्रेक्षकांची धाकधुक वाढली होती.
advertisement
4/9
अशातच रितेश देशमुखने भाऊच्या धक्क्यावर १० व्या आठवड्यात घराबाहेर पडणाऱ्या स्पर्धकाचे नाव जाहीर केले आणि प्रेक्षकांसह घरातील सदस्यांनाही धक्का बसला आहे.
advertisement
5/9
प्रेक्षकांनी केलेल्या वोटिंगनुसार सागर कारंडे आणि विशाल कोटियन यांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आणि ते या आठवड्यासाठी सेफ झाले आहेत. तिसऱ्या स्थानावर राकेश बापट सेफ झाला आहे.
advertisement
6/9
विशाल कोटियन या आठवड्यात कॅप्टन असल्यामुळे तो पुढच्या आठवड्यातील नॉमिनेशनपासून सेफ आहे. दरम्यान, आता त्याने थेट शोच्या १२ व्या आठवड्यात प्रवेश केला आहे.
advertisement
7/9
शेवटच्या टप्प्यात प्रभू, रेवा, दिपाली आणि संस्कृती यांच्यात चुरस होती. मात्र, दुर्दैवाने संस्कृतीला सर्वात कमी मते मिळाल्याने तिला घराबाहेर पडावे लागले आहे.
advertisement
8/9
संस्कृतीने या शोमध्ये वाइल्ड कार्ड म्हणून एन्ट्री केली होती. सुरुवातीपासूनच तिच्या खेळाबद्दल स्पर्धकांमध्ये वेगवेगळी मते होती. स्पर्धकांच्या मते संस्कृती या घराबाहेर जाण्यास पात्र होती. अशातच रितेशने संस्कृतीच्या नावाची घोषणा करत तिला घराबाहेर येण्यास सांगितले.
advertisement
9/9
यानुसार सागर, संकेत, विशाल, राखी, राकेश, तन्वी, अनुश्री, प्रभू, रेवा, दिपाली हे या सीझनचे टॉप १० स्पर्धक ठरले असून त्यांच्यामध्ये आता विजेतेपदासाठी थेट लढत होणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
TOP 10 मध्ये पोहोचण्याआधीच दाखवला बाहेरचा रस्ता, रितेश देशमुखने सुनावला अंतिम निर्णय, पाहा कोण आलं घराबाहेर?