TRENDING:

177 एपिसोडची महाभयानक वेबसीरिज, पाहिल्यावर उजेडातही भीतीने उडेल थरकाप! 'ही' हॉरर सीरिज OTT वर धुमाकूळ घालतेय

Last Updated:
OTT Trending Horror Series: ही सीरिज पाहिल्यावर सतत तुम्हाला तुमच्या पाठीमागे कोणीतरी उभं आहे किंवा तुम्हाला दाराआडून कोणीतरी बघतंय असा भास होईल.
advertisement
1/7
177 एपिसोडची महाभयानक वेबसीरिज, पाहिल्यावर उजेडातही भीतीने उडेल थरकाप!
मुंबई : हॉरर कंटेंट बघताना तुमचीही बोबडी वळते, पण पाहताना एक वेगळीच किक बसते का? जर तुमचं उत्तर हो असेल तर ही वेबसीरिज तुम्हाला भीतीचा एक वेगळाच अनुभव तुम्हाला देईल, यात शंका नाही. ही सीरिज पाहिल्यावर सतत तुम्हाला तुमच्या पाठीमागे कोणीतरी उभं आहे किंवा तुम्हाला दाराआडून कोणीतरी बघतंय असा भास होईल.
advertisement
2/7
हॉलिवूडमध्ये सर्वाधिक गाजलेली सीरिज आता ओटीटीवर प्रेक्षकांचा थरकाप उडवायला सज्ज झाली आहे. ही आहे 'द वॉकिंग डेड' (The Walking Dead). २०१० मध्ये सुरू झालेल्या या सीरिजची क्रेझ आजही तितकीच आहे. आजवर या सीरिजचे तब्बल ११ सीझन रिलीज झाले असून यातील १७७ एपिसोड्सनी प्रेक्षकांना वेड लावलं आहे.
advertisement
3/7
रॉबर्ट किर्कमॅन यांच्या कॉमिक बुकवर आधारित असलेली ही सीरिज ही केवळ एक कथा नाही, तर चालत्या-फिरत्या प्रेतांचं म्हणजेच झोम्बींचं एक असं जग आहे, जिथून बाहेर पडणं अशक्य आहे.
advertisement
4/7
कथेच्या सुरुवातीला रिक ग्राइम्स हा पोलिस अधिकारी कोमातून जागा होतो आणि त्याला धक्काच बसतो. संपूर्ण जगात एक भयानक व्हायरस पसरला असून माणसं आता माणसं उरलेली नसून झोम्बी बनली आहेत. शहरं ओस पडली आहेत, रस्त्यावर फक्त नरमांस खाणारे झोम्बी फिरत आहेत.
advertisement
5/7
रिक आणि त्याचे काही साथीदार या नरकातून वाचण्यासाठी आणि स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी कशी धडपड करतात, याचा अंगावर काटा आणणारा प्रवास या सीरिजमध्ये दाखवण्यात आला आहे.
advertisement
6/7
'द वॉकिंग डेड' केवळ तिच्या कथेमुळेच नाही, तर त्यातील कलाकारांच्या दमदार अभिनयामुळेही गाजली असून या सीरिजला IMDb वर ८.१ इतकं जबरदस्त रेटिंग मिळालं आहे.
advertisement
7/7
नॉर्मन रीडस, मेलिसा मॅकब्राइड, लॉरेन कोहन आणि जेफ्री डीन मॉर्गन यांसारख्या दिग्गजांनी या सीरिजमध्ये अफलातून अभिनय केला आहे. विशेष म्हणजे जेफ्री डीन मॉर्गनच्या एन्ट्रीने सीरिजमध्ये जो ट्विस्ट आणला, तो आजही अनेकांना शॉक देतो. जर तुमच्यात हे १७७ एपिसोड्स पाहण्याचं धाडस असेल, तर ही सीरिज तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.<span style="font-size: 20px;"> </span><span style="font-size: 20px;"> </span>
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
177 एपिसोडची महाभयानक वेबसीरिज, पाहिल्यावर उजेडातही भीतीने उडेल थरकाप! 'ही' हॉरर सीरिज OTT वर धुमाकूळ घालतेय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल