BBM6 Nomination: 'काटा गँग'ला मोठा धक्का! 11 व्या आठवड्यात घराबाहेर पडणार महत्त्वाचा स्पर्धक, अखेर शॉकिंग नाव समोर आलंच
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Nomination Week 11: या आठवड्यात 'फॅमिली वीक'मध्ये घरातील सदस्य आपल्या घरातल्यांना भेटून ढसाढसा रडले होते. पण आता याच आठवड्यात कोणाचं तरी फिनालेचं स्वप्न भंगणार आहे.
advertisement
1/9

'बिग बॉस मराठी'चा सहावा सीझन आता अशा वळणावर आला आहे, जिथे मैत्री, नाती आणि इमोशन्स बाजूला ठेवून प्रत्येकजण फक्त ट्रॉफीसाठी भिडताना दिसतोय.
advertisement
2/9
१७ स्पर्धकांपासून सुरू झालेला हा प्रवास आता 'टॉप १०' वर येऊन ठेपला आहे. अशातच या टॉप १० मधून या आठवड्यात एक स्पर्धक कमी होणार आहे.
advertisement
3/9
या आठवड्यात 'फॅमिली वीक'मध्ये घरातील सदस्य आपल्या घरातल्यांना भेटून ढसाढसा रडले होते. पण आता याच आठवड्यात कोणाचं तरी फिनालेचं स्वप्न भंगणार आहे.
advertisement
4/9
या ११ व्या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी तब्बल ७ जण डेंजर झोनमध्ये आहेत. या आठवड्यात नॉमिनेशनच्या कचाट्यातून सुटणं कोणालाच जमलं नाही.
advertisement
5/9
विशाल कोटियन घराचा कॅप्टन बनून सुरक्षित झाला असला, तरी ७ जणांवर मात्र एलिमिनेशनची तलवार लटकतेय. या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेटेड झालेले स्पर्धक आहेत राकेश बापट, दीपाली सय्यद, प्रभू शेळके, रेवा कौरसे, सागर कारंडे, अनुश्री माने आणि संकेत पाठक.
advertisement
6/9
सध्या सोशल मीडियावर फिरणाऱ्या काही व्होटिंग ट्रेंड्सनुसार एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. सोशल मीडिया गाजवणारा प्रभू शेळके सध्या व्होटिंगमध्ये सर्वात मागे असल्याचं बोललं जातंय.
advertisement
7/9
प्रभूने आपल्या साध्या आणि सरळ स्वभावाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती, पण या आठवड्यात त्याचं पारडं थोडं हलकं पडताना दिसतंय. जर हे ट्रेंड्स खरे ठरले, तर प्रभूला घराबाहेर पडावं लागू शकतं.
advertisement
8/9
या आठवड्यात तन्वी कोल्ते घराची नवी कॅप्टन बनली आहे. प्रभू शेळकेला एकदा तरी या घराचा कॅप्टन बनायचं होतं, पण त्याचं हे स्वप्न पूर्ण होणार नसल्याचं सध्यातरी दिसतंय. मात्र, 'बिग बॉस'च्या घरात कधी काय होईल, हे कोणीच सांगू शकत नाही. शेवटच्या क्षणी कोणाचंही नशीब पालटू शकतं.
advertisement
9/9
येत्या शनिवारी आणि रविवारी होणाऱ्या 'भाऊचा धक्का' एपिसोडमध्ये रितेश देशमुख या आठवड्यातील खेळावर स्पर्धकांची शाळा घेणार आहेत. पण सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत त्या रविवारी होणाऱ्या घोषणेकडे. टॉप १० मधून बाहेर पडणारा तो दुर्दैवी सदस्य कोण असेल?
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
BBM6 Nomination: 'काटा गँग'ला मोठा धक्का! 11 व्या आठवड्यात घराबाहेर पडणार महत्त्वाचा स्पर्धक, अखेर शॉकिंग नाव समोर आलंच