'तुला सोडलं, तरी माझ्याकडे 25 ऑप्शन', सुपरस्टार अभिनेता बायकोला हे काय बोलून गेला?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
भोजपुरी सिनेसृष्टीचा सुपरस्टार म्हणवल्या जाणाऱ्या अभिनेत्याने आपल्या पत्नीबद्दल धक्कादायक विधान केलं आहे, ज्यामुळे खळबळ उडाली आहे.
advertisement
1/9

मुंबई: आपल्या देशात वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. अशातच प्रत्येक भाषेतील प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी अनेक कलाकार त्यांचे कलागुण आपल्या चाहत्यांसमोर सादर करत असतात.
advertisement
2/9
बॉलिवूड, टॉलिवूडप्रमाणेच उत्तर भारतात भोजपुरी सिनेमे पाहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. येथील कलाकारांची तुफान फॅन फॉलोविंग आहे. अशातच भोजपुरी सिनेसृष्टीचा सुपरस्टार म्हणवल्या जाणाऱ्या अभिनेत्याने आपल्या पत्नीबद्दल धक्कादायक विधान केलं आहे, ज्यामुळे खळबळ उडाली आहे.
advertisement
3/9
भोजपुरी चित्रपटसृष्टीचे ट्रेंडिंग स्टार म्हणून ओळखला जाणारा खेसारी लाल यादव नेहमीच आपल्या चित्रपटांमुळे आणि गाण्यांमुळे चर्चेत असतो. पण यावेळी तो एका व्हिडिओतील त्याच्या पत्नीबद्दलच्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे.
advertisement
4/9
खेसारीने पत्नी चंदा देवीसोबतच्या भांडणाबद्दल बोलताना मोठे आणि स्पष्ट विधान केले आहे, ज्यामुळे त्याच्या चाहत्यांना वैयक्तिक नात्यांमधील एक वेगळी आणि विचार करायला लावणारी बाजू पाहायला मिळाली आहे.
advertisement
5/9
खेसारी लाल आणि पत्नी चंदा यांचा २००६ साली विवाह झाला. खेसारी अनेकदा आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलत असतो. अलीकडेच त्याने एका मुलाखतीत सांगितले की, इतर सर्वसामान्य लोकांप्रमाणेच त्याचेही बायकोशी जोरदार वाद होतात. पण त्या भांडणांमुळे नाते तोडायचे नसते.
advertisement
6/9
खेसारीने अत्यंत स्पष्टपणे सांगितले, "मी दोन दिवसांपूर्वी चंदाला म्हणालो की, जर आज मी तुला सोडले, तर पाच मिनिटांत माझ्याकडे २५ पर्याय उभे राहतील, पण काय खात्री आहे की, ती नवीन मुलगी सहा महिन्यांनंतर माझ्याशी भांडणार नाही? सहा महिन्यांनंतर तीही मला चंदासारखीच वाटेल. मग मी किती जणींना सोडणार?"
advertisement
7/9
खेसारीच्या म्हणण्यानुसार, ही गोष्ट फक्त त्यालाच नव्हे, तर त्याच्या पत्नीलाही लागू होते. तो म्हणाला, "होऊ शकते की, सहा महिन्यांसाठी तुलाही माझ्यापेक्षा चांगला पती मिळेल, पण तोही सहा महिन्यांनंतर भांडणार नाही, याची काय खात्री?"
advertisement
8/9
म्हणूनच नात्यातील अडचणींवर मात करून ती टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे, यावर खेसारीने भर दिला. त्याने सांगितले की, त्याच्यासाठी नातेसंबंध खूप महत्त्वाचे आहेत.
advertisement
9/9
खेसारी आणि चंदाला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. तो 'बिग बॉस'मध्येही अनेकदा पत्नीचे कौतुक करताना दिसला होता. सध्या कामाच्या आघाडीवर त्याचे 'लाल घघरी' हे गाणे खूप गाजत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'तुला सोडलं, तरी माझ्याकडे 25 ऑप्शन', सुपरस्टार अभिनेता बायकोला हे काय बोलून गेला?