एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; संपत्तीत शाहरुखलाही सोडलं मागे
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान नाव, पैसा आणि लोकप्रियतेच्या बाबतीत नेहमीच आघाडीवर असतो. पण या वेळी संपत्तीच्या शर्यतीत त्यालाही मागे टाकणारं एक नाव समोर आलं आहे.
advertisement
1/7

बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान नाव, पैसा आणि लोकप्रियतेच्या बाबतीत नेहमीच आघाडीवर असतो. पण या वेळी संपत्तीच्या शर्यतीत त्यालाही मागे टाकणारं एक नाव समोर आलं आहे. एकही सिनेमा केल्याशिवाय हा व्यक्ती बॉलीवूडच्या अब्जाधीशांच्या लिस्टमध्ये जाऊन बसला.
advertisement
2/7
हुरुन इंडिया रिच लिस्ट 2025 नुसार शाहरुख खानची एकूण संपत्ती 1.4 अब्ज डॉलर्स म्हणजेच जवळपास 12,490 कोटी रुपये इतकी आहे. त्यामुळे तो जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत अव्वल ठरला.
advertisement
3/7
पण बॉलीवूडमध्ये त्याच्यापेक्षा श्रीमंत आहे निर्माता आणि उद्योगपती रॉनी स्क्रूवाला, ज्यांची संपत्ती तब्बल 1.5 अब्ज डॉलर्स 13,300 कोटी इतकी आहे. बहुतेकांना माहित नसेल, पण रॉनी स्क्रूवाला हे भारतीय मनोरंजन उद्योगाचे ‘गेम चेंजर’ आहेत.
advertisement
4/7
त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात टूथब्रश बनवणाऱ्या कंपनीतून केली, पण त्यांची दृष्टी मोठी होती. भारतात केबल टीव्हीचा पाया घालणारे म्हणूनही त्यांना ओळखले जाते.
advertisement
5/7
1997 मध्ये त्यांनी स्थापन केलेल्या UTV स्टुडिओज ने बॉलीवूडमध्ये नवे युग सुरू केले. ‘स्वदेस’, ‘लक्ष्य’, ‘रंग दे बसंती’, ‘जोधा अकबर’, आणि ‘फॅशन’ सारखे हिट चित्रपट त्यांच्या निर्मितीतून पडद्यावर आले.
advertisement
6/7
2012 मध्ये, वॉल्ट डिस्नेने यूटीव्ही कंपनी विकत घेतली आणि त्यानंतर रॉनी यांनी पुन्हा आपले बिझनेस साम्राज्य विस्तारले. त्यांनी सुरू केलेल्या RSVP Movies या बॅनरखाली ‘केदारनाथ’, ‘उरी: द सर्जिकल स्ट्राईक’ आणि ‘सॅम बहादूर’ सारखे यशस्वी चित्रपट बनले.
advertisement
7/7
रॉनी स्क्रूवाला यांची संपत्ती केवळ चित्रपटांमधून आलेली नाही. त्यांचा प्रमुख व्यवसाय शिक्षण आणि ऑनलाईन लर्निंग क्षेत्राशी निगडीत आहे. त्यांनी स्थापन केलेले upGrad हे भारतातील सर्वात यशस्वी एडटेक स्टार्टअप्सपैकी एक आहे. याशिवाय त्यांनी Unilazer Ventures नावाच्या गुंतवणूक कंपनीद्वारे अनेक स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे. रॉनी स्क्रूवाला यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. ते बॉलीवूडचे “सर्वात श्रीमंत पण न दिसणारे सुपरस्टार” आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; संपत्तीत शाहरुखलाही सोडलं मागे