TRENDING:

कोटींचं कर्ज अन् जमीन विकण्याची वेळ! अमाल मलिकला काढावे लागले हालाखीचे दिवस, एका गाण्याने बदललं आयुष्य

Last Updated:
Bigg Boss 19 Amaal Malik: संगीतकार-गायक अमाल मलिक हा बिग बॉस १९च्या ग्रँड फिनालेच्या शर्यतीतून बाहेर पडणारा पहिला स्पर्धक ठरला आहे. टॉप ५ मध्ये पोहोचलेल्या अमालला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे.
advertisement
1/11
कोटींचं कर्ज अन् जमीन विकण्याची वेळ! अमाल मलिकला काढावे लागले हालाखीचे दिवस
संगीतकार-गायक अमाल मलिक हा बिग बॉस १९च्या ग्रँड फिनालेच्या शर्यतीतून बाहेर पडणारा पहिला स्पर्धक ठरला आहे. टॉप ५ मध्ये पोहोचलेल्या अमालला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे.
advertisement
2/11
मुंबई: 'बिग बॉस १९' च्या घरात संगीतकार-गायक अमाल मलिक याने आपल्या आयुष्यातील आर्थिक संघर्ष, कौटुंबिक अडचणी आणि इंडस्ट्रीतील कठोर वास्तव याबद्दल अत्यंत भावूक आणि प्रामाणिक खुलासा केला.
advertisement
3/11
अमाल मलिकने सांगितले की, एक काळ असा होता जेव्हा त्याचे कुटुंब मोठ्या कर्जाखाली दबले होते. "आमच्या कुटुंबावर साडेतीन ते चार कोटी रुपयांचे कर्ज होते. घर आणि गाडी विकायची वेळ जवळ आली होती," असे त्याने स्पष्ट केले. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी त्याने आणि त्याचा भाऊ अरमान मलिकनेही खूप कष्ट केले.
advertisement
4/11
या आर्थिक तंगीमागे आजोबांची गंभीर तब्येत आणि त्यांच्यावर झालेला मोठा खर्च हे महत्त्वाचे कारण होते. मामा किंवा इतर कोणाचीही मदत मिळाली नाही, त्यामुळे कुटुंबाला कर्जाचा बोजा उचलावा लागला.
advertisement
5/11
"त्या कठीण काळात, माझा भाऊ अरमान व्हॉईस-ओव्हर्स करून १५ ते २० हजार रुपये कमवायचा, ज्यामुळे कुटुंबाला मोठा आधार मिळत होता," असे अमालने नमूद केले.
advertisement
6/11
इंडस्ट्रीत येण्यासाठी अमालला संघर्ष करावा लागला. अमालने एका हाय-प्रोफाइल पार्टीतील एक घटना सांगितली. "इंडस्ट्रीत संपर्क साधणे इतके सोपे नाही, त्यामुळे मी एका असिस्टंट डायरेक्टर मित्राच्या मदतीने एकता कपूरच्या पार्टीत गेलो होतो," असे त्याने सांगितले.
advertisement
7/11
तो पार्टीत असताना एका ज्येष्ठ लेखकाने त्याचा शर्ट खेचला आणि विचारले, 'तू इथे काय करतोय?' अमालने जेव्हा मित्राच्या ओळखीने आल्याचे सांगितले, तेव्हा त्या लेखकाने त्याला धक्का देत सांगितले, "एका वर्षात तू तुझ्या आयुष्यातील मोठे गाणे करशील आणि मग मी तुला भेटेन."
advertisement
8/11
"तो धक्का मला अजूनही आठवतो, कारण मी स्लो मोशनमध्ये खाली पडलो होतो," अमाल भावूक होऊन म्हणाला.
advertisement
9/11
अमालने वडिलांच्या नावाचा वापर न करण्याचा निर्धार केला होता. "मी कधीही वडिलांचे नाव वापरले नाही. मी कीबोर्ड घेऊन काम शोधत फिरत असायचो," असे त्याने सांगितले.
advertisement
10/11
एकदा तो एका व्यक्तीला भेटला आणि लिफ्टमध्ये त्याने आपली चार गाणी गाऊन दाखवली. त्यानंतर त्याला आपले पहिले मोठे काम मिळाले. त्याने 'सूरज डूबा है' या गाण्याला चाल लावली. विशेष म्हणजे, पार्टीत भेटलेल्या त्याच लेखकाने नंतर हे गाणे लिहिले.
advertisement
11/11
अमालने वडिलांना सांगितले की, त्याला रणबीर कपूरच्या चित्रपटात पहिले गाणे मिळाले आहे, तेव्हा ते खूप आनंदी झाले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
कोटींचं कर्ज अन् जमीन विकण्याची वेळ! अमाल मलिकला काढावे लागले हालाखीचे दिवस, एका गाण्याने बदललं आयुष्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल