TRENDING:

Bigg Boss फेम अर्शी खान अफगाणिस्तानच्या क्रिकेटरच्या प्रेमात! लवकरच विवाहबंधनात अडकणार; कोण आहे तो?

Last Updated:
Arshi Khan Dating Aftab Alam: अर्शी खान सध्या अफगाणिस्तानचा क्रिकेटर आफताब आलम याला डेट करत आहे आणि दोघे लवकरच लग्नबंधनात अडकण्याची शक्यता आहे.
advertisement
1/8
Bigg Boss फेम अर्शी खान अफगाणिस्तानच्या क्रिकेटरच्या प्रेमात! लवकरच करणार लग्न
मुंबई: 'बिग बॉस ११' मध्ये आपल्या धमाकेदार व्यक्तिमत्त्वाने आणि बिनधास्त अंदाजाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री अर्शी खान सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
advertisement
2/8
बिग बॉसच्या घरात शिल्पा शिंदेसोबतचे तिचे गोड-आंबट नाते असो वा विकास गुप्तासोबतची मैत्री, अर्शीने प्रेक्षकांच्या मनात एक खास जागा निर्माण केली आहे. आता ही रिअॅलिटी स्टार लवकरच तिच्या आयुष्यातील एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
advertisement
3/8
माहितीनुसार, अर्शी खान सध्या अफगाणिस्तानचा क्रिकेटर आफताब आलम याला डेट करत आहे आणि दोघे लवकरच लग्नबंधनात अडकण्याची शक्यता आहे.
advertisement
4/8
अर्शी खान आणि आफताब आलम गेल्या काही महिन्यांपासून एकमेकांना डेट करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या जोडप्याच्या जवळच्या सूत्रांनी TellyChakkar.com ला माहिती दिली की, "अर्शी आणि आफताब बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत आणि आता ते त्यांच्या नात्याला पुढील स्तरावर घेऊन जाण्याचा विचार करत आहेत. सर्व गोष्टी जुळून आल्यास, हे दोघे फेब्रुवारी २०२६ मध्ये लग्न करू शकतात."
advertisement
5/8
आफताब आलम हा अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघातील एक प्रसिद्ध खेळाडू आहे. अर्शी आणि आफताब यांच्या भेटीगाठी कशा झाल्या आणि त्यांचे प्रेम कसे फुलले, याबाबतची माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे.
advertisement
6/8
या बातमीबाबत अर्शी खान किंवा आफताब आलम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
advertisement
7/8
अर्शी खानचे नाव अनेकदा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर एहसान मशी याच्यासोबत जोडले गेले होते. एहसानसोबतच्या व्हिडिओमुळे ती सतत चर्चेत असायची, पण अर्शीने वारंवार स्पष्ट केले आहे की, त्यांच्यात केवळ मैत्रीचे नाते आहे आणि ते दोघे कामासाठी एकत्र येत असतात.
advertisement
8/8
जर सूत्रांनी दिलेली माहिती खरी असेल, तर लवकरच अर्शी खान आणि आफताब आलम यांच्याकडून त्यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. या जोडप्याच्या नात्याबद्दल आणि लग्नाबद्दल चाहत्यांना मोठी उत्सुकता लागून राहिली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss फेम अर्शी खान अफगाणिस्तानच्या क्रिकेटरच्या प्रेमात! लवकरच विवाहबंधनात अडकणार; कोण आहे तो?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल