बिग बॉस मराठीत मोठा ट्विस्ट! या आठवड्यात 'भाऊचा धक्का' नाही, होणार वेगळाच 'कार्यक्रम'
- Published by:Minal Gurav
Last Updated:
riteish deshmukh bhaucha dhakka in bigg boss marathi 5 : अभिनेता रितेश देशमुखने बिग बॉस मराठीच्या भाऊच्या धक्क्यावर येऊन त्याचं एक वेगळं रुप प्रेक्षकांना दाखवलं. प्रेक्षक दर विकेंडला रितेशच्या भाऊच्या धक्क्याची वाट पाहत असतात. पण या आठवड्यात भाऊचा धक्काच होणार नाहीये.मग नेमकं काय होणार?
advertisement
1/7

'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन सुरू झाल्यापासून वीकेंडला 'भाऊचा धक्का' पार पडत होता. रितेश देशमुखच्या भाऊच्या धक्क्याची प्रेक्षकही आतुरतेनं वाट पाहायचे.
advertisement
2/7
पण बिग बॉसच्या आठव्या आठवड्यात प्रेक्षकांना मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. वीकेंडला 'बिग बॉस मराठी'च्या घरात भाऊचा धक्काच होणार नाहीये.
advertisement
3/7
भाऊचा धक्का नाही म्हणजे रितेशही नाही. रितेश नाही मग आठवड्याभरात काय झाला याचा धक्का सदस्यांना कोण देणार असा प्रश्न समोर येतो.
advertisement
4/7
या विकेंडला भाऊचा धक्का न होता 'महाराष्ट्राचा धक्का' पार पडणार आहे. घरात प्रेस कॉन्फरन्स होणार आहे. त्याचप्रमाणे डॉ. निलेश साबळे देखील घरातील सदस्यांना प्रश्न विचारून हास्याचं इंजेक्शन देणार आहे.
advertisement
5/7
डीपी दादा तुम्हाला अभिजीतची काही समस्या आहे का? बिग बॉस संपल्यानंतर निक्कीसोबतचं अरबाजचं नातं तसचं राहणार का? जान्हवीचं काय चुकलं? सूरज कधी गेम दाखवणार?
advertisement
6/7
निक्कीला असं वाटतंय का अरबाजच्या घरातून जाण्यानंतर आपल्याला दुसरा साथिदार हवा? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना आज मिळणार आहेत.
advertisement
7/7
सर्वसामान्य जनतेला आणि 'बिग बॉस'प्रेमींना पडलेले प्रश्न पत्रकार घरातील सदस्यांना विचारणार आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
बिग बॉस मराठीत मोठा ट्विस्ट! या आठवड्यात 'भाऊचा धक्का' नाही, होणार वेगळाच 'कार्यक्रम'