Bigg Boss Marathi 6 : हा राखी सावंत शो नाही! ड्रामा क्वीनची मोठी चूक, भडकला रितेश; कान धरले, तरी माफी नाही
- Published by:Priya Lad
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Rakhi Sawant : बिग बॉस आणि राखी सावंत यांचं नातं वेगळंच आहे. पण राखीने आता असं काही केलं आहे की हा राखी सावंत शो नाही असं म्हणत रितेशने राखीला चांगलंच सुनावलं आहे.
advertisement
1/7

बिग बॉस आणि राखी सावंत म्हणजे समीकरणच झालं आहे. बिग बॉसचं घर म्हटलं की तिथं राखी सावंत हवीच. हिंदी आणि मराठी दोन्ही बिग बॉसच्या कित्येक सीझनमध्ये राखी सावंत दिसली आहे. बिग बॉस मराठी 6 सुरू झालं तेव्हाही राखीच्या नावाची चर्चा होती, राखी हवी अशी कित्येक प्रेक्षकांची मागणी होती आणि अखेरबिग बॉस मराठी 6 च्या घरातही राखीने वाइल्ड कार्ड एंट्री घेतली.
advertisement
2/7
राखीचंही बिग बॉसशी एक वेगळंच नातं आहे. कोणतंही सीझन असो राखी बिग बॉसच्या घरात आली की अगदी हक्काने आपलं घर असल्यासारखी राहते आणि सदस्यांसोबत तशीच वागते. जणू काही हा राखी सावंतचाच शो आहे. आता मात्र राखीने असं काही केलं की रितेशने हा राखी सावंत शो नाही असं स्पष्टपणे थेट सांगितलं आहे.
advertisement
3/7
या आठवड्यात राखी सावंतने केलेला ड्रामा पाहून रितेश देशमुख भडकला. भाऊचा धक्कावर त्याने तिला चांगलंच सुनावलं आहे. हा बिग बॉस आहे, स्क्रिप्टेड शो नाही, राखी सावंतचा शो नाही, असं रितेश म्हणाला.
advertisement
4/7
यावर राखी उभं राहून कान धरून माफी मागताना दिसते. पण तरी रितेशचा राग काही कमी होत नाही. एक मिनिट, डन असं तो म्हणतो आणि प्रोमो संपतो.
advertisement
5/7
रितेश राखीवर रागावण्याचं कारण म्हणजे राखी आणि संकेतमध्ये झालेला ड्रामा. ज्यात संकेतने राखीवर पाणी फेकलं होतं. हे स्क्रिप्टेड असल्याचं रितेश सांगतो.
advertisement
6/7
रितेश म्हणतो, "संकेत तुमच्यात आणि राखीत काहीतरी संवाद होतात. की मी काहीतरी करते आणि तू पाणी फेक माझ्यावर. पाणी फेकायचं नाटक करता, रागात यायचं नाटक करता. हा राखी सावंत शो नाही आहे"
advertisement
7/7
बिग बॉस मराठी 6 च्या भाऊचा धक्काच्या या प्रोमोत रितेशने चूक दाखवल्यानंतर राखी माफी मागताना तर दिसते. पण तरी रितेश भडकलेला आहे. आता पुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : हा राखी सावंत शो नाही! ड्रामा क्वीनची मोठी चूक, भडकला रितेश; कान धरले, तरी माफी नाही