BBM 6 : बापरे, एवढी मोठी शिक्षा! अन्नाची नासाडी केल्याने राखीसोबत हे काय केलं; प्रेक्षकांनी 'बिग बॉस'लाच झापलं
- Published by:Priya Lad
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Bhaucha Dhakka : या आठवड्यात राखीने जेवणावरून चांगलाच ड्रामा केला. तिने जेवण अक्षरश: फेकून दिलं आणि याची किंमत आता तिला मोजावी लागणार आहे.
advertisement
1/7

बिग बॉस मराठी 6 मध्ये या आठवड्यात राखीने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. तिने अन्नाची नासाडी केली. यासाठी तिला शिक्षा सुनावण्यात आली आहे. पण अशी शिक्षा जी ऐकताच प्रेक्षकांनी बिग बॉसला ट्रोल केलं आहे.
advertisement
2/7
अशी राखीला काय शिक्षा सुनावली ज्यामुळे बिग बॉस ट्रोल झालं, त्याआधी राखीने नेमकं काय केलं होतं ते पाहुयात. राखी भाजी बनवत होती तेव्हा रेवा आणि दिपालीने चहा बनवायला ठेवला. राखीने गुपचूप भाजीतील वांगं चहात टाकलं. यानंतर घरातील बहुतेक सदस्य राखीशी भांडू लागले. शेवटी राखीने भाजीच फेकून दिली.
advertisement
3/7
यानंतर आता हे आपल्या अंगाशी येणार हे राखीला कळून चुकलं, त्यामुळे तिने मोठा ड्रामा केला. भाजीत थुंकी पडत असल्याचं भांडणावेळी संकेतने निदर्शनास आणून दिलं. राखीने शेवटी तिने हेच कारण देत भाजी फेकल्याचं सांगत सारवासारव केली. फेकलेल्या भाजीजवळ जाऊन ती पाहत तिने पश्चातापही व्यक्त केला.
advertisement
4/7
यानंतर घरातील सदस्य राखीला याची शिक्षा मिळणार असं म्हणतात. तेव्हाही राखी त्यांना तुम्ही मला शिक्षा सुनावणार, तुमच्यात इतकी हिंमत आहे, असं विचारताना दिसते. पण अखेर राखीला तिच्या कृत्याची शिक्षा मिळाली.
advertisement
5/7
घरातील सदस्य नाही पण भाऊचा धक्कावर रितेश देशमुखने राखी सावंतला मोठी शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा एक दिवस किंवा एका आठवड्यापुरती नाही तर संपूर्ण सीझनसाठी आहे.
advertisement
6/7
भाऊचा धक्काचा नवीन प्रोमो समोर आला आहे. ज्यात रितेश राखीला अन्नाची नासाडी केल्याबद्दल शिक्षा सुनावताना दिसतो. रितेश बोलतो, राखी तुम्हाला अन्नाची किंमत नाही आहे हे लोकांना आणि महाराष्ट्राला दिसलं आहे. याची शिक्षा तुम्हाला मिळणार.
advertisement
7/7
पूर्ण सीझन तिला कॅप्टन होता येणार नाही. म्हणजे राखी आता बिग बॉस मराठी 6 च्या घरात कधीच कॅप्टन बनणार नाही, असं रितेश सांगतो. यावर प्रेक्षकांनी बापरे इतकी मोठी शिक्षा, खरंच आम्ही थक्क झालो, अशा उपहासात्मक कमेंट केल्या आहेत. कारण राखीला हेच हवं होतं, तिला कॅप्टन व्हायचंच नव्हतं असं प्रेक्षकांनी म्हटलं आहे. ही शिक्षा आहे ही वरदान असा सवालही प्रेक्षकांनी केला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
BBM 6 : बापरे, एवढी मोठी शिक्षा! अन्नाची नासाडी केल्याने राखीसोबत हे काय केलं; प्रेक्षकांनी 'बिग बॉस'लाच झापलं