TRENDING:

'बिग बॉस'चा मोठा धक्का! एक नाही, दोन सदस्य Bigg Boss Marathi 6 मधून OUT; पहिला प्रभू मग दुसरा कोण?

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Eviction : बिग बॉस मराठी 6 मध्ये या आठवड्यात डबल एव्हिक्शन झालं आहे. घराबाहेर जाणार एक सदस्य म्हणजे प्रभू तर आता दुसऱ्या सदस्याचंही नाव समोर आलं आहे.
advertisement
1/9
'बिग बॉस'चा मोठा धक्का! एक नाही, दोन सदस्य Bigg Boss Marathi 6 मधून OUT; पहिला प्रभू मग दुसरा कोण?
बिग बॉस मराठी 6 मध्ये यावेळी सदस्यच नाही तर प्रेक्षकांनाही मोठा धक्का मिळाला आहे. या आठवड्यात एक नाही तर दोन सदस्य घरातून बाहेर गेले आहेत.
advertisement
2/9
बिग बॉस मराठी 6 मधून छोटा डॉन प्रभू शेळके बाहेर पडल्याची माहिती आहे. त्यामुळे काटा ग्रुपसाठी हा मोठा धक्का आहे.
advertisement
3/9
पण आता प्रभूसोबत आणखी एक सदस्य घराबाहेर जाणार आहे. या आठवड्यात डबल एव्हिक्शन होणार असल्याचं भाऊचा धक्कावर रितेश देशमुखने जाहीर केलं आहे.
advertisement
4/9
बिग बॉस मराठी 6 च्या भाऊचा धक्काचा प्रोमोमध्ये रितेश काटा आणि टोळी दोन्ही ग्रुपमधील एक एक सदस्य बाहेर पडणार असल्याचं सांगतो.
advertisement
5/9
या आठवड्यात टॉप 10 पैकी एकूण 7 सदस्य नॉमिनेट झाले होते. यामध्ये दिपाली सय्यद, प्रभू शेळके, राकेश बापट, रेवा कौरासे, अनुश्री माने, सागर कारांडे आणि संकेत पाठक यांचा समावेश होता.
advertisement
6/9
काटा गँगमधील दिपाली, रेवा, राकेश आणि प्रभू यांचा समावेश आहे. त्यापैकी प्रभूच्या नावावर तर शिक्कामोर्तब झालं आहे.
advertisement
7/9
तर टोळी गँगमधील सागर, अनुश्री, संकेत नॉमिनेट झाले आहेत. आता या तिघांपैकी नेमका कोण घरातून बाहेर पडणार?
advertisement
8/9
टोळी गँगमधील बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडणारा तो सदस्य आहे संकेत पाठक. ज्याचा या घरातील प्रवास संपला संपल्याची चर्चा आहे. सोशल मीडियावर त्याचं नाव समोर आलं आहे. 
advertisement
9/9
सुरुवातीचे 17 स्पर्धक आणि त्यानंतर 4 वाइल्ड कार्ड एंट्री, असा बिग बॉस मराठीचा सहावा सीझन ज्यात आता फक्त 8 स्पर्धक उरले आहेत.  यामध्ये अनुश्री, राकेश, तन्वी, सागर, दिपाली, रेवा, विशाल, राखी यांचा समावेश आहे. आता या सीझनचा विजेता कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. तसंच बिग बॉस मराठी 6 चा फिनाले कधी होणार हा प्रश्नही चाहत्यांना पडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या सीझनचा ग्रँड फिनाले 19 एप्रिल 2026 रोजी म्हणजेच रविवारी पार पडणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'बिग बॉस'चा मोठा धक्का! एक नाही, दोन सदस्य Bigg Boss Marathi 6 मधून OUT; पहिला प्रभू मग दुसरा कोण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल