Bigg Boss Marathi 6 : स्वतःच्या बॉडीचा माज..! ओमकार-विशालच्या मारामारीवर रितेश संतापला, भाऊच्या धक्क्यावर शाळा
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 च्या सीझनचा पहिला भाऊचा धक्का होणार आहे. पहिल्याच धक्क्याला रितेश चांगलाच संतापला.
advertisement
1/7

बिग बॉस मराठी 6 सुरू होऊन एक आठवडा झाला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र या क्षणाची वाट पाहत होता तो 'भाऊचा धक्का' आज दाखवला जाणार आहे. आठवडाभर घरात झालेल्या धिंगण्याची आणि स्पर्धकांची भाऊ शाळा घेणार आहे.
advertisement
2/7
या सीझनच्या स्पर्धकांनी पहिल्याच आठवड्यात इतका गोंधळ घातलाय की रितेश देखमुख पहिल्याच भाऊच्या धक्क्याला चांगलाच संतापला आहे. इथे फक्त भाऊगिरी चालणार म्हणत रितेशनं स्पर्धकांना झापलं आहे.
advertisement
3/7
कॅप्टन्सी टास्कमध्ये विशाल आणि ओमकार यांच्यात प्रचंड हाणामारी झाली. दोघांनी एकमेकांचे गळे धरले. दोघांनी टास्कमध्ये प्रचंड बळाचा वापर केला ज्यात ओमकार जखमी झाला. या सगळ्या भांडणांमुळे बिग बॉसला टास्क रद्द करावा लागला. घरातही तणावाचं वातावरण पाहायला मिळालं.
advertisement
4/7
'भाऊचा धक्का' या विशेष भागात रितेश देशमुखने घरातील माहोल आणि धक्काबुक्की पाहून विशाल आणि ओमकार या स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली. रितेश म्हणाला, "हा शो आता फक्त तरुणांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर महाराष्ट्रातील प्रत्येक घरात संपूर्ण कुटुंब एकत्र बसून हा कार्यक्रम पाहतो." अशा वेळी स्पर्धकांनी दाखवलेलं हे वर्तन चुकीचा आदर्श देत असल्याचं रितेशनं ठणकावून सांगितलं.
advertisement
5/7
रितेश पुढे म्हणाला, "आपल्याकडे दोघे आहेत ज्यांना बोलण्यासाठी काहीच नाहीये का? फक्त मारामारी आणि स्वतः:च्या बॉडीचा, ताकदीचा प्रचंड माज आहे ... एकमेकांच्या अंगावर धावून जायचं , धक्काबुक्की करायची, धमक्या द्यायच्या हेच आदर्श तुम्ही प्रेक्षकांना देणार का?" अशा शब्दांत रितेश भाऊंनी आपली नाराजी व्यक्त केली.
advertisement
6/7
रितेश भाऊ म्हणाला, "विशाल आणि ओमकार, नीट ऐका. हे घर आहे, रस्त्यावरचा नाका नाही जिथे तुमची दादागिरी चालेल. लक्षात ठेवा, हे माझं घर आहे आणि इथे दादागिरी नाही, तर फक्त 'भाऊगिरी' चालणार!"
advertisement
7/7
रितेश देशमुख यांनी ज्या पद्धतीने घरातील शिस्त जपण्याचा प्रयत्न केला आहे, ते कौतुकास्पद आहे. केवळ ओरडून नाही, तर अत्यंत संयमी पण कडक शब्दांत त्यांनी स्पर्धकांना त्यांच्या चुकीची जाणीव करून दिली. अजून काय काय घडले जाणून घेण्यासाठी बघा भाऊंचा धक्का...
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : स्वतःच्या बॉडीचा माज..! ओमकार-विशालच्या मारामारीवर रितेश संतापला, भाऊच्या धक्क्यावर शाळा