TRENDING:

Bigg Boss Marathi 6 मध्ये मोठा Twist! 'भाऊचा धक्का'आधी रितेश देशमुखने दिली हिंट

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठी 6 मध्ये भाऊच्या धक्क्याआधी एका प्रोमोत रितेश देशमुखने मोठ्या ट्विस्टची हिंट दिली आहे.
advertisement
1/5
Bigg Boss Marathi 6 मध्ये मोठा Twist! 'भाऊचा धक्का'आधी रितेश देशमुखने दिली हिंट
बिग बॉस मराठी 6 च्या घरातील नववा आठवडा. आता वीकेंड आहे. म्हणजे भाऊचा धक्का, एव्हिक्शन. भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख कुणाचं कौतुक करणार, कुणाची शाळा घेणार, घरातून कोणता सदस्य बाहेर पडणार, आणखी काय काय घडणार हे सगळं पाहण्याची उत्सुकता आहे.
advertisement
2/5
यादरम्यान बिग बॉस मराठी 6 च्या भाऊचा धक्काचा नवीन प्रोमो समोर आला आहे. ज्यातून बिग बॉस मराठीत मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार असल्याचं दिसतं आहे.
advertisement
3/5
भाऊच्या धक्काआधी रितेश देशमुखने बिग बॉस मराठी 6 मधील ट्विस्टबाबत हिंट दिली आहे.  हा सीझन नंबर 6 आहे इथं ट्विस्ट फिक्स आहे, असं रितेश देशमुख सांगताना दिसतो आहे. आता बिग बॉस मराठी 6 मधील हा ट्विस्ट म्हणजे नेमकं काय घडणार, काय असणार याची प्रतीक्षा सगळ्यांना आहे.
advertisement
4/5
दरम्यान बिग बॉसच्या घरातून या आठवड्यात घराबाहेर जाणाऱ्या सदस्याचं नावही समोर आलं आहे. त्याच्या नावाची चर्चा सोशल मीडियावर रंगते आहे. बिग बॉस मराठी 6 च्या घरातून या आठवड्यात घराबाहेर जाणारा सदस्य आहे प्राजक्ता शुक्रे.
advertisement
5/5
जिचा गेम सुरुवातीपासून कधीच दिसला नाही. सदस्य आणि प्रेक्षकांनाही ते दिसलं. रितेशनेही यावरून प्राजक्ताला सुनावलं होतं. तिला घराबाहेर काढण्याची मागणी सातत्याने होत होती. अखेर तिचा बिग बॉसमधील प्रवास संपल्याचं सांगितलं जातं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 मध्ये मोठा Twist! 'भाऊचा धक्का'आधी रितेश देशमुखने दिली हिंट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल