TRENDING:

'हे' आहेत 'Bigg Biss Marathi 6'च्या घरातील 6 कन्फर्म सदस्य, प्रीमिअरच्या काही तास आधी समोर आली लिस्ट

Last Updated:
Bigg Boss Marathi Season 6 Confirm Contestants : 'बिग बॉस मराठी सीझन 6'च्या खेळाला आजपासून सुरुवात होणार असून आता प्रीमिअरच्या काही तास आधीच या घरातील कन्फर्म सदस्यांची नावे समोर आली आहेत.
advertisement
1/7
'हे' आहेत 'Bigg Biss Marathi 6'च्या घरातील 6 कन्फर्म सदस्य, समोर आली लिस्ट
'बिग बॉस मराठी'च्या घराचं दार अखेर आज 11 जानेवारी 2025 रोजी रात्री 8 वाजता उघडलं जाणार आहे. या नव्या सीझनच्या माध्यमातून महाराष्ट्राचं तुफान रितेश देशमुख घेऊन येणार आहे. नवा सीझन, नवं घर आणि नवीन स्पर्धकांची 'बिग बॉस'प्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच आता प्रीमिअरच्या काही तास आधी 'बिग बॉस मराठी सीझन 6'च्या घरातील कन्फर्म सदस्यांची नावे समोर आली आहेत.
advertisement
2/7
करण सोनवणे (Karan Sonawane) : लोकप्रिय कंटेंट क्रिएटर, स्टँड-अप कॉमेडियन आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर करण सोनवणे आपल्या विनोदी व्हिडीओंसाठी ओळखला जातो. 'फोकस्ड इंडियन' म्हणूनही तो प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. थिएटर करता करता 2014-15 मध्ये तो कंटेंट किएटर बनला.
advertisement
3/7
सागर कारंडे (Sagar Karande) : 'चला हवा येऊ द्या' फेम सागर कारंडे आता 'बिग बॉस मराठी'चं सहावं पर्व गाजवायला सज्ज आहे. सागर कारंडेने आजवर अनेक विनोदी भूमिका साकारल्या आहेत. 'चला हवा येऊ द्या'मध्ये त्याने साकारलेल्या पोस्टमनची घराघरांत चर्चा झाली. आता बिग बॉसच्या घरात सागर कारंडे काय धुमाकूळ घालणार हे पाहावे लागेल.
advertisement
4/7
आयुष संजीव (Aayush Sanjeev) : मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आयुष संजीव आता 'बिग बॉस मराठी 6'चं घर गाजवायला सज्ज आहे. 'बॉस माझी लाडाची' या मालिकेच्या माध्यमातून त्याने मालिका विश्वात पदार्पण केलं होतं.
advertisement
5/7
सोनाली राऊत (Sonali Raut) : भारतीय मनोरंजनसृष्टीतील मॉडेल आणि अभिनेत्री सोनाली राऊत आपल्या बोल्ड अभिनयासाठी ओळखली जाते. 'द एक्सपोज','ग्रेट ग्रँड मस्ती' या चित्रपटांत सोनाली राऊतच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली आहे. सलमानचा'बिग बॉस 8' गाजवल्यानंतर आता मराठी बिग बॉसमध्ये धमाका करायला ती सज्ज आहे.
advertisement
6/7
राधा पाटील (Radha Patil) : प्रसिद्ध लावणी नृत्यांगना राधा पाटीलची तुलना अनेकदा गौतमी पाटीलसोबत केली जाते. 'राधा मुंबईकर' म्हणूनही तिची विशेष ओळख आहे. सोशल मीडियावर राधा पाटील चर्चेत असते. आता नृत्य विश्व गाजवल्यानंतर 'बिग बॉस मराठी 6'मध्ये ती धुमाकूळ घालताना दिसेल.
advertisement
7/7
दीपाली सय्यद (Dipali Sayyad) : मराठी मालिका, चित्रपट आणि जाहिरातींमध्ये काम करत दीपाली सय्यदने महाराष्ट्रातील घराघरांत आपलं नाव कमावलं. आपल्या नृत्याने आणि रोखठोक विधानांनी त्या कायम चर्चेत राहिल्या. राजकारणातही त्या सक्रीय आहेत. आता बिग बॉस मराठीच्या घरात राडा घालायला त्या सज्ज आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'हे' आहेत 'Bigg Biss Marathi 6'च्या घरातील 6 कन्फर्म सदस्य, प्रीमिअरच्या काही तास आधी समोर आली लिस्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल