Chhaava 2: 2025 ची ब्लॉकबस्टर, आता येतोय सीक्वेल! विकी कौशल पुन्हा उद्ध्वस्त करणार मुघलांचं साम्राज्य, रिलीज डेट काय?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Chhaava 2 : 'छावा'ला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर निर्मात्यांनी या चित्रपटाच्या सीक्वलची, म्हणजेच 'छावा २' ची तयारी सुरू केली असल्याची बातमी समोर आली आहे.
advertisement
1/9

बॉलिवूडचा बायोपिक स्टार विकी कौशल सध्या त्याच्या करिअरच्या टॉपवर आहे. कोणत्याही बायोपिकला तो स्पर्श करतो, त्याचं तो सोनं करतो. अशीच एक फिल्ममध्ये छावा. गेल्या वर्षी १४ फेब्रुवारीला ही फिल्म रिलीज झाली आणि ती विकीच्या करिअरमधली सर्वांत मोठी हिट ठरली.
advertisement
2/9
छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा आणि पराक्रमाच्या या थराराने बॉक्स ऑफिसवर वादळ आणलं. या फिल्ममधील विकीचा अभिनय पाहून प्रेक्षकांच्या अंगावर अक्षरशः शहारे आले. लक्ष्मण उतेकर यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा सिनेमा विकी कौशलच्या करिअरमधील टर्निंग पॉईंट ठरला.
advertisement
3/9
अशातच आता 'छावा'च्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आहे. 'छावा'ला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर निर्मात्यांनी या चित्रपटाच्या सीक्वलची, म्हणजेच 'छावा २' ची तयारी सुरू केली असल्याची बातमी समोर आली आहे.
advertisement
4/9
नुकतंच ई-टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, 'छावा'च्या पहिल्या भागात छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा प्रेक्षकांनी अनुभवल्यानंतर आता दुसऱ्या भागात संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांचा जीवनप्रवास मांडला जाणार आहे.
advertisement
5/9
या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे, संभाजी महाराजांची भूमिका अजरामर केल्यानंतर आता विकी कौशल स्वतः त्यांच्या मुलाच्या, म्हणजेच शाहू महाराजांच्या भूमिकेत दिसण्याची दाट शक्यता आहे.
advertisement
6/9
समोर आलेल्या माहितीनुसार, विकी कौशलनेही या फिल्ममध्ये रस दाखवला असून २०२७ किंवा २०२८ च्या सुरुवातीला या फिल्मच्या शूटिंगला सुरुवात होण्याची शक्यता आहे. चित्रपटाची अधिकृत घोषणा अद्याप झाली नसली, तरीही लक्ष्मण उतेकर-विकी कौशल ही जोडी पुन्हा एकदा पाहण्यास प्रेक्षक आतुर झाले आहेत.
advertisement
7/9
शाहू महाराज यांचा इतिहास अंगावर शहारे आणणारा आहे. वडील संभाजी महाराजांच्या हौतात्म्यानंतर औरंगजेबाने शाहू महाराजांना बालपणातच कैद केलं होतं. अनेक वर्ष त्यांनी मुघलांच्या कैदेत घालवली.
advertisement
8/9
कैदेतून सुटल्यानंतर त्यांनी विखुरलेली मराठा सत्ता पुन्हा एकदा कशी एकत्र केली आणि पेशव्यांच्या मदतीने साम्राज्याचा विस्तार कसा केला, हा 'छावा २' चा मुख्य गाभा असणार आहे.
advertisement
9/9
दरम्यान, 'छावा' हिट झाल्यानंतर विकीच्या हाती मोठ्या बजेटचे सिनेमे लागले आहेत. संजय लीला भन्साळी यांच्या लव्ह अँड वॉर या चित्रपटात विकी कौशल, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्यासोबत दिसणार आहे. याशिवाय विकीकडे 'महावतार' नावाचा आणखी एक पौराणिक चित्रपट आहे, ज्याचा फर्स्ट लूक पाहिल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.<span style="font-size: 20px;"> </span><span style="font-size: 20px;"> </span>
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Chhaava 2: 2025 ची ब्लॉकबस्टर, आता येतोय सीक्वेल! विकी कौशल पुन्हा उद्ध्वस्त करणार मुघलांचं साम्राज्य, रिलीज डेट काय?