खिशात 1200 रुपये, घर सोडून मुंबईत आला अभिनेता; लोकांना हसवून बनला 300 कोटींच्या संपत्तीचा मालक
- Published by:Minal Gurav
Last Updated:
बॉलिवूड अभिनेता खिशात 1200 रुपये घेऊन घर सोडून मुंबईत आला. खूप स्ट्रगल केला आज लोकांना हसवून तो 300 कोटींच्या संपत्तीचा मालक बनला.
advertisement
1/10

हिंदी टेलिव्हिजन आणि बॉलिवूडचा असा एक अभिनेता ज्याने प्रत्येक घरात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. जो माणूस आज करोडो रुपये कमावतो त्याचा पहिला पगार फक्त 500 रुपये होता.
advertisement
2/10
खिशात केवळ 1200 रुपये असताना हा अभिनेता गावाहून मुंबईत आला. मुंबईत स्ट्रगल करून काम मिळवलं. लहानपणीच त्याने आई-वडिल गमावले.
advertisement
3/10
विश्वास बसणार नाही पण आज त्याने लोकांना हसवून तब्बल 300 कोटींची संपत्ती निर्माण केली आहे. कोण आहे हा अभिनेता?
advertisement
4/10
आपण बोलत आहोत प्रसिद्ध टीव्ही कॉमेडियन कपिल शर्माबद्दल. 'द कपिल शर्मा शो' हा टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध कार्यक्रमांपैकी एक आहे. ज्यामध्ये प्रसिद्ध बॉलिवूड कलाकार सहभागी होतात.
advertisement
5/10
कपिल शर्माने लहान वयातच आपल्या वडिलांना गमावले होते. एक वेळ अशी होती की त्याच्याकडे आपल्या बहिणीच्या लग्नासाठीसुद्धा पैसे नव्हते. ज्या कपिलने आपल्या करिअरची सुरुवात केवळ 500 रुपयांनी केली होती, त्याची आजची एकूण संपत्ती अंदाजे 300 कोटी रुपये आहे.
advertisement
6/10
कपिल हे कॉमेडी इंडस्ट्रीमधील एक असे नाव आहे, ज्याची लोकप्रियता आणि स्टारडम अनेक मोठ्या सेलिब्रिटींपेक्षा खूप जास्त आहे. परंतु इथपर्यंतचा त्याचा प्रवास अनेक चढ-उतारांनी भरलेला होता. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी कपिलच्या खांद्यावर आली. सुरुवातीला एका कॉमेडी शोच्या ऑडिशनमधून त्याला नाकारण्यात आलं.
advertisement
7/10
कपिल शर्माचा जन्म 2 एप्रिल 1981 रोजी पंजाबमधील अमृतसर येथे झाला. त्याचे वडील, जितेंद्र कुमार, हेड कॉन्स्टेबल होते आणि त्याची आई, जानकी राणी, गृहिणी आहेत. कपिलला एक मोठा भाऊ आणि एक मोठी बहीण देखील आहे. कपिल लहानपणापासूनच खूप खोडकर आणि खेळकर होता. त्याला टीव्हीवरील कलाकारांची नक्कल करायला आवडायचे. लहानपणापासूनच तो आपल्या खोड्यांनी लोकांना हसवायचा पण तेव्हा कोणालाच माहीत नव्हते की एक दिवस तो आपल्या विनोदाने जगावर राज्य करेल.
advertisement
8/10
कपिलचे वडील कर्करोगामुळे निधन पावले. वडिलांच्या निधनानंतर त्याला पोलीस विभागात नोकरीची संधी मिळाली पण त्याने ती नाकारली. कपिलला लहानपणापासूनच गायक व्हायचं होतं. मात्र नंतर तो नाट्यक्षेत्रात आला.
advertisement
9/10
लहान वयातच कामाला सुरुवात कपिलने लहान वयातच कामाला सुरुवात केली. सुरुवातीला तो एका पीसीओ बूथवर काम करायचा. त्याला 500 रुपये पगार मिळायचा. दहावी पूर्ण केल्यानंतर तो एका कापड गिरणीत काम करू लागला. जिथे तो महिन्याला 900 रुपये मिळायचे. सुट्टीत कपिल कामाच्या शोधात 1200 रुपये घेऊन मुंबईला गेला पण रिकाम्या हाताने अमृतसरला परतला.
advertisement
10/10
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कपिलची एकूण संपत्ती सुमारे 330 कोटी रुपये आहे. त्याच्या मालकीच्या आलिशान गाड्यांमध्ये 1.25 कोटी रुपये किमतीची व्होल्वो एक्ससी 90 आणि 1.20 कोटी रुपये किमतीची मर्सिडीज-बेंझ एस 350 सीडीआय यांचा समावेश आहे. तो दरवर्षी 15 कोटी रुपये आयकर भरतो. पंजाबमध्ये त्याच्या मालकीचे 25 कोटी रुपये किमतीचे एक आलिशान फार्महाऊस आहे. तो मुंबईत ज्या अपार्टमेंटमध्ये राहतो त्याची किंमत 15 कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
खिशात 1200 रुपये, घर सोडून मुंबईत आला अभिनेता; लोकांना हसवून बनला 300 कोटींच्या संपत्तीचा मालक