TRENDING:

धर्मेंद्र यांचा जबरा फॅन, अभिनेत्याने त्यालाच धु-धु धुतलं, मग घरी जाऊन केली खातिरदारी, असं घडलं तरी काय?

Last Updated:
Dharmendra : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र धर्मेंद्र यांचा धाकटा मुलगा बॉबी देओलने एका मुलाखतीत वडिलांशी संबंधित एक खूपच धक्कादायत किस्सा सांगितला, जेव्हा धर्मेंद्र यांनी एका फॅनला अक्षरशः मारलं होतं.
advertisement
1/8
धर्मेंद्र यांचा जबरा फॅन, अभिनेत्याने त्यालाच धु-धु धुतलं, मग घरी जाऊन...
मुंबई: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र त्यांच्या रंगेल स्वभावामुळे आणि रागीट व्यक्तिमत्त्वासाठीही खूप प्रसिद्ध आहेत. आजही त्यांची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे.
advertisement
2/8
नुकतंच धर्मेंद्र यांचा धाकटा मुलगा बॉबी देओलने एका मुलाखतीत वडिलांशी संबंधित एक खूपच अविश्वसनीय पण मजेशीर किस्सा सांगितला, जेव्हा धर्मेंद्र यांनी एका उत्साही फॅनला अक्षरशः मारलं होतं.
advertisement
3/8
अभिनेता बॉबी देओलने यूट्यूबर राज शमानीशी बोलताना हा किस्सा सांगितला. बॉबी म्हणाला की, त्याचे वडील धर्मेंद्र सगळ्यांना खूप प्रेम आणि आदर देतात. पण, काही वेळा काही चाहत्यांनी मूर्खपणा केल्यामुळे त्यांनी आपला संयम गमावला आहे.
advertisement
4/8
बॉबी त्या दिवसाची आठवण सांगताना म्हणाला, “एकदा माझ्यासमोर पापांनी एका फॅनला मारलं होतं. तो माणूस पापांच्यापाया पडला आणि म्हणाला, ‘सर, मी तुमच्यावर प्रेम करतो. मला माफ करा!’” बॉबीला वाटायचं की, वडील असं का करत आहेत? पण त्या फॅनने काहीतरी मूर्खपणाचं किंवा अपमानास्पद बोललं असेल, ज्यामुळे धर्मेंद्र यांचा पारा चढला.
advertisement
5/8
बॉबी पुढे हसत-हसत म्हणाला, “पापांनी त्याला मारलं खरं, पण दुसऱ्याच क्षणी त्यांना त्याची काळजी वाटली! त्यांनी त्याला पकडलं, घरी आत आणलं, बसवलं, त्याला दूध दिलं, जेवण दिलं आणि एवढंच नव्हे, तर त्याला नवीन कपडेही दिले!”
advertisement
6/8
बॉबी म्हणाला, “ते असेच आहेत. ते अॅक्शन मॅन आहेत. माझा भाऊ सनीच्या ‘ढाई किलो का हात’ बद्दल लोक बोलतात, पण तुम्ही माझ्या पापांचा हात पाहिलेला नाही. तो वीस किलोचा आहे!” धर्मेंद्र यांच्या स्वभावातला हा प्रेमळपणा आणि राग दोन्ही या किस्स्यातून दिसून येतो.
advertisement
7/8
बॉबीने त्याच्या लहानपणीच्या आठवणीही सांगितल्या. रंगा-बिल्ला या कुख्यात गुंडांच्या धमकीमुळे धर्मेंद्र त्याच्या सुरक्षेबद्दल खूप जागरूक होते. बॉबीला घराबाहेर जायला परवानगी नसायची आणि त्याला रात्री ९ वाजताचा कर्फ्यू होता.
advertisement
8/8
सध्या बॉबी देओल ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या शोमुळे चर्चेत आहे, तर धर्मेंद्र लवकरच श्रीराम राघवनच्या ‘इक्कीस’ या चित्रपटात दिसेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
धर्मेंद्र यांचा जबरा फॅन, अभिनेत्याने त्यालाच धु-धु धुतलं, मग घरी जाऊन केली खातिरदारी, असं घडलं तरी काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल