TRENDING:

Bollywood Actor : महिन्याला 30 लाखाची नोकरी सोडून आला बॉलिवूडमध्ये, आता इंडस्ट्रीत त्याचाच बोलबाला; कोण आहे तो?

Last Updated:
Bollywood Celebrity : अनेकजण संघर्ष करत असताना, एका तरुणाने मात्र ज्या नोकरीतून दर महिन्याला ३० लाख रुपये मिळत होते, ती सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला. हा तरुण आज यशाच्या शिखरावर पोहोचला आहे.
advertisement
1/7
महिन्याला 30 लाखाची नोकरी सोडून आला बॉलिवूडमध्ये, आता इंडस्ट्रीत त्याचाच बोलबाला
मुंबई: चित्रपटसृष्टीत येऊन स्टार बनण्याचे स्वप्न लाखो लोक पाहतात, पण हा प्रवास सोपा नसतो. दररोज या क्षेत्रात नाव कमावण्यासाठी येतात, पण यातील केवळ मोजकेच यशस्वी होतात.
advertisement
2/7
अनेकजण संघर्ष करत असताना, एका तरुणाने मात्र ज्या नोकरीतून दर महिन्याला ३० लाख रुपये मिळत होते, ती सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला. हा तरुण आज यशाच्या शिखरावर पोहोचला असून, सध्या तो एका मोठ्या वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत दिसतोय.
advertisement
3/7
हा अभिनेता आहे लक्ष्य लालवानी, जो 'किल' आणि सध्या गाजत असलेल्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' या मालिकेमुळे चर्चेत आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या दिग्दर्शकीय डेब्यूची ही पहिली सीरिज आहे, ज्यात लक्ष्यने मुख्य भूमिका साकारली आहे.
advertisement
4/7
अभिनेता लक्ष्य लालवानीने एका मुलाखतीत खुलासा केला की, तो अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी जी नोकरी करत होता, त्यातून त्याला प्रचंड पैसा मिळत होता. तो दिवसाला कमीत कमी १५ हजार रुपये कमवत असे, तर काही वेळेस २५ हजार रुपयांपर्यंत ही कमाई पोहोचायची.
advertisement
5/7
लक्ष्यने सांगितले की, त्याचे वडील त्याला एकदा म्हणाले होते की, "लक्ष्यची एका दिवसाची कमाई माझ्या महिन्याच्या पगाराएवढी आहे." पण लक्ष्यने स्वतःहून सांगितले की, त्याची महिन्याची कमाई ३० लाख रुपयांपर्यंत जायची. इतकी मोठी आणि सुरक्षित नोकरी सोडून अभिनयात येण्यासाठी संघर्ष करण्याचा निर्णय घेणे, हे नक्कीच सोपे नव्हते. त्याने आपल्या आवडीसाठी ही मोठी जोखीम पत्करली.
advertisement
6/7
लक्ष्यने आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात दूरचित्रवाणीवरून केली होती. 'अधूरी कहानी हमारी', 'प्यार तूने क्या किया' आणि 'परदेस में है मेरा दिल' यांसारख्या मालिकांमध्ये त्याने काम केले.
advertisement
7/7
यानंतर त्याला 'किल' या ॲक्शन-ड्रामा चित्रपटातून जागतिक स्तरावर ओळख मिळाली आणि आता त्याने मोना सिंग आणि बॉबी देओलसारख्या मोठ्या कलाकारांसोबत 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' मध्ये काम केलंय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bollywood Actor : महिन्याला 30 लाखाची नोकरी सोडून आला बॉलिवूडमध्ये, आता इंडस्ट्रीत त्याचाच बोलबाला; कोण आहे तो?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल