वन नाइट स्टँड अन् डायरेक्ट प्रेग्नंट झाली बॉलिवूड अभिनेत्री; एकटीनेच जाऊन केलेलं अबॉर्शन
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bollywood Actress : बॉलिवूडची एक अभिनेत्री एका वन नाईट स्टँडमुळे प्रेग्नेंट झाली होती. त्यावेळी तिने एकटीने जाऊन गर्भपात करण्याचा निर्णय घेतला होता.
advertisement
1/7

1. बॉलिवूड अभिनेत्री कुब्रा सैतने नुकतंच एका मुलाखतीत आपल्या वैयक्तिक आयुष्यातील एक गोष्ट शेअर केली आहे. अभिनेत्री लग्नाआधी एका वन नाईट स्टँडमुळे वयाच्या 30 व्या वर्षी प्रेग्नंट झाली होती. त्यामुळे अभिनेत्रीला अबॉर्शन करावं लागलं होतं.
advertisement
2/7
विरल भयानीला दिलेल्या मुलाखतीत कुब्रा सैत म्हणाली,"जेव्हा तुम्ही कठीण परिस्थितीचा सामना करत असता तेव्हा तुम्हाला खऱ्या अर्थाने कळतं की समाज तुम्हाला कसं पाहतो आणि काय योग्य काय अयोग्य आहे".
advertisement
3/7
कुब्रा पुढे म्हणाली,"त्या वेळी खरंच समजत नव्हतं की मी जे ठरवते आहे ते बरोबर आहे की नाही. पण आज मी आत्मविश्वासाने म्हणू शकते की मी तेव्हा जे निर्णय घेतले, ते माझ्यासाठी योग्य होते. कारण जर काही चूक झालीही असती, तरी देव आपल्यासोबत असतो आणि त्याच्या दरबारात तो बरोबर हिशोब देतो."
advertisement
4/7
कुब्राने याआधी अबॉर्शनबद्दल खुलासा केला होता की, अबॉर्शनच्या काही वर्षांनंतर एका प्रोजेक्टचं शूटिंग करताना खूप अस्वस्थ वाटायचं. त्यावेळी अभिनेत्रीला तिव्र रक्तस्त्राव आणि चिडचिड व्हायची. पण त्यावेळी तिने कोणालाही न सांगता सगळं सहन करण्याचा निर्णय घेतला".
advertisement
5/7
‘सेक्रेड गेम्स’ फेम कुब्रा सैतने 2022 साली ‘Open Book: Not Quite a Memoir’ या पुस्तकात आपल्या आयुष्यातील अनुभव मोकळेपणाने शेअर केले. तिने लिहिलं होतं की हे पुस्तक लिहिताना तिला जाणवलं की, आपल्याशी आणि आपल्या निर्णयांशी एकरुप असणं खूप महत्त्वाचं असतं.
advertisement
6/7
फर्जी, द ट्रायल, वकालत फ्रॉम होम आणि शहर लखोट या महत्त्वाच्या प्रोजेक्टचा कुब्रा भाग होती.
advertisement
7/7
कुब्रा लवकरच 'है जवानी तो इश्क होना है' या चित्रपटात झळकणार आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
वन नाइट स्टँड अन् डायरेक्ट प्रेग्नंट झाली बॉलिवूड अभिनेत्री; एकटीनेच जाऊन केलेलं अबॉर्शन