TRENDING:

मुंबईत बक्कळ कमावलं, फॉरेनला इन्व्हेस्ट केलं; शाहरुख ते ऐश्वर्या राय... बॉलिवूड स्टार्सची लक्झरी प्रॉपर्टी

Last Updated:
Bollywood Celebrities Luxury Homes in Foreign : शाहरुख खानचा 'मन्नत' असो किंवा अमिताभ बच्चनचा 'जलसा' ही आलिशान घरं पाहण्यासाठी अनेक लोक गर्दी करतात. या कलाकारांनी फक्त मुंबईतच नव्हे तर विदेशातही भव्य घरं घेतली आहेत. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यात विशेष रस दाखवला आहे.  मुंबईत पैसे कमावून कलाकारांनी फॉरेनमध्ये मोठी प्रॉपर्टी खरेदी केली आहे.
advertisement
1/12
शाहरुख ते ऐश्वर्या राय... बॉलिवूड स्टार्सची फॉरेनमध्येही लग्झरी प्रॉपर्टी
बॉलिवूडमध्ये अनेक दिग्गज कलाकार आहेत ज्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर केवळ यश आणि प्रसिद्धीच नाही, तर मोठ्या प्रमाणात संपत्ती आणि मालमत्ता देखील मिळवली आहे. विशेषतः शाहरुख खान, अक्षय कुमार, अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांसारख्या स्टार्सची आलिशान घरे नेहमीच चर्चेत असतात.
advertisement
2/12
शाहरुख खानची दुबई ते लंडनपर्यंत आलिशान मालमत्ता आहे. दिल्लीतून मुंबईत आलेला शाहरुख खान आज ग्लोबल स्टार आहे. मुंबईत त्याचा मन्नत बंगला आहे. दुबईत जन्नत बंगला आहे. दिल्लीतही त्याचा बंगला असून त्याने काही वर्षांआधीच अलिबागमध्ये जमीन खरेदी केली आहे.
advertisement
3/12
दुबईच्या पाम जुमेराह येथे शाहरुखचा ‘जन्नत’ नावाचा व्हिला. 14,000 चौरस फूट असलेल्या या व्हिलाची किंमत 18 कोटी रुपये आहे. यात प्रायव्हेट सी साइड, प्रशस्त खोल्या आणि आधुनिक सुविधा आहेत.
advertisement
4/12
लंडनच्या पार्क लेनवर त्यांचं दुसरं घर आहे. त्याच्या या घराची किंमत 183 कोटी रुपये आहे. त्याची मुलं त्यांच्या शिक्षणाच्या काळात या घरात राहत होते.
advertisement
5/12
बॉलिवूडमधील पॉवर कपल अभिषेक आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचं दुबईतील जुमेराह गोल्फ इस्टेट्स परिसरात आलिशान घर आहे. 10,600 चौरस फूट क्षेत्रफळावर पसरलेला हा आलिशान व्हिला आहे. या व्हिलाची किंमत 80 कोटी रुपये आहे.
advertisement
6/12
या घरात होम ऑटोमेशन सिस्टम, स्काव्होलिनी डिझाइन किचन, पूल डेक, वॉक-इन कपाट आणि 18-होल गोल्फ कोर्स अशा सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत.
advertisement
7/12
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचे पती राज कुंद्रा यांचाही लंडनमध्ये 'राज महल' नावाचं व्हिला आहे. हा व्हिला सेंट जॉर्ज हिल इस्टेट येथे असून या घरात 7 बेडरूम्स आहेत. घरात झाडांनी सजवलेला ड्राइव्हवे आणि आकर्षक डेकोरेशन केलेलं आहे.
advertisement
8/12
त्याचबरोबर शिल्पा आणि राज यांचं ऑक्सफर्ड स्ट्रीट येथेही दुसरं एक घर आहे. सुट्टीत ते याच घरी जातात. दुबईतही पाम जुमेराह व्हिला हा त्यांचा मालकीचा आहे.
advertisement
9/12
देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिनेही विदेशात अनेक मालमत्तांमध्ये गुंतवणूक केली आहे. 2017 मध्ये तिने न्यूयॉर्कमधील फोर सीझन्स रेसिडेन्सेसमध्ये अपार्टमेंट खरेदी केलं.
advertisement
10/12
2019 मध्ये निक जोनासशी लग्न केल्यानंतर बेव्हरली हिल्समध्ये 6.5 मिनियन डॉलरची हवेली विकत घेतली.
advertisement
11/12
प्रियांचं लॉस एंजेलिसमध्ये 20 मिलियन डॉलर्सचं आलिशान घर आहे. 20,000 चौरस फूटांहून अधिक पसरलेल्या या हवेलीत 7 बेडरूम्स, 11 बाथरूम्स, आणि इन्फिनिटी पूलसह मोठं लिव्हिंग रूम आहे.
advertisement
12/12
अभिनेता अक्षय कुमार याची लंडन आणि केपटाऊन येथे आलिशान घरं आहेत. त्याची ही दोन्ही घरे आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहेत आणि घराच्या आत सुंदर डेकोरेशन करण्यात आलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
मुंबईत बक्कळ कमावलं, फॉरेनला इन्व्हेस्ट केलं; शाहरुख ते ऐश्वर्या राय... बॉलिवूड स्टार्सची लक्झरी प्रॉपर्टी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल