TRENDING:

Bollywood Controversy : वन-नाइट स्टँडमध्ये मुलीच्या हाती लागलं अभिनेत्याचं भयानक सिक्रेट, करू लागली ब्लॅकमेल, कसं मिटलं प्रकरण?

Last Updated:
Bollywood blackmail case : प्रायव्हेट डिटेक्टिव्ह म्हणून काम करणाऱ्या तान्या पुरी यांनी एक शॉकिंग अनुभव सांगितला आहे, ज्यामुळे बॉलिवूडमधील अनेक सिक्रेट्स उघड झाली आहेत.
advertisement
1/8
वन-नाइट स्टँडमध्ये मुलीच्या हाती लागलं अभिनेत्याचं सिक्रेट, करू लागली ब्लॅकमेल
मुंबई: कॅमेऱ्यासमोरची सिनेमाची दुनिया जितकी आकर्षक आणि ग्लॅमरस वाटते, तितकीच कॅमेऱ्यामागील तिची दुनिया द्वेष, विश्वासघात आणि फसवणुकीने भरलेली आहे. प्रायव्हेट डिटेक्टिव्ह म्हणून काम करणाऱ्या तान्या पुरी यांनी नुकताच असाच एक शॉकिंग अनुभव सांगितला आहे, ज्यामुळे बॉलिवूडमधील अनेक सिक्रेट्स उघड झाली आहेत.
advertisement
2/8
एका मुलाखतीत तान्या पुरी यांनी एका टॉप बॉलिवूड अभिनेत्याच्या ब्लॅकमेलिंग प्रकरणाचा खुलासा केला, ज्याला त्याची गुप्त ओळख जगासमोर आणण्याची धमकी दिली गेली होती.
advertisement
3/8
तान्या पुरी यांनी सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, इंडस्ट्रीमध्ये ब्लॅकमेलिंगचे अनेक प्रकार घडत असतात. त्यांनी एका तरुण अभिनेत्याचे उदाहरण दिले, जो सार्वजनिकरित्या आपली ओळख उघड करत नव्हता, पण तो गे असल्याची माहिती अनेकांना होती.
advertisement
4/8
तान्या पुरी यांनी सांगितले, "हा अभिनेता एका क्लबमध्ये एका मुलीसोबत वन-नाईट स्टॅन्डमध्ये अडकला होता. त्यावेळी त्या मुलीने अभिनेत्याच्या गे असण्याचे पुरावे मिळवले आणि त्याला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली."
advertisement
5/8
त्या मुलीने अभिनेत्याला धमकावले आणि त्याच्याकडे मोठ्या रकमेची मागणी केली. "जर तू मला एवढे पैसे दिले नाहीस, तर मी तुझे हे सत्य संपूर्ण जगासमोर आणणार," असे तिने धमकावले. हा अभिनेता या जाळ्यात पूर्णपणे अडकला होता. त्यानंतर त्याच्या टीमने तान्या पुरी यांच्याशी संपर्क साधला.
advertisement
6/8
"ती असे का करत आहे, हे जाणून घेण्यासाठी त्या अभिनेत्याची टीम त्या मुलीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ इच्छित होती. अशा प्रकरणांना सोडवायला महिने लागतात," असे तान्या म्हणाल्या.
advertisement
7/8
अखेरीस, दोन्ही पक्षांनी वाटाघाटी करून एक निर्णय घेतला. विशेष म्हणजे, त्या मुलीविरुद्धही काही पुरावे डिटेक्टिव्ह टीमला मिळाले होते, ज्यामुळे अभिनेत्याला मदत झाली.
advertisement
8/8
तान्या यांनी स्पष्ट केले की, या सेटलमेंटमध्ये त्या मुलीला कोणतेही पैसे दिले गेले नाहीत आणि अभिनेत्याची गुप्त ओळखही जगासमोर आली नाही. याशिवाय, तान्या पुरी यांनी एका टॉप अभिनेत्याने आपल्या पत्नीला धोका दिल्याचा आणि एका अभिनेत्रीने एस्कॉर्ट म्हणून काम केल्याचाही उल्लेख केला, मात्र त्यांनी कोणाचेही नाव उघड केले नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bollywood Controversy : वन-नाइट स्टँडमध्ये मुलीच्या हाती लागलं अभिनेत्याचं भयानक सिक्रेट, करू लागली ब्लॅकमेल, कसं मिटलं प्रकरण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल