Weather Alert: अचानक बदलली हवा, मराठवाड्याला हुडहुडी, छ. संभाजीनगरसह 8 जिल्ह्यांचं हवामान अपडेट
- Reported by:Kale Narayan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत असून पावसाने उघडीप घेतलीये. आता छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यात थंडीचा कडाका वाढत आहे.
advertisement
1/5

नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात सर्वदूर पाऊस झाला. आत मात्र अवकाळी संकट टळल्याचे चित्र असून पावसाने माघार घेतलीये. पावसाने उघडीप दिल्यानंतर हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत असून आता थंडीचा कडाका वाढला आहे. शुक्रवार, 7 नोव्हेंबरचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/5
मराठवाड्यातील हवामानात आज मोठे बदल जाणवत आहेत. छत्रपती संभाजीनगरसह एकाही जिल्ह्यात पावसाची शक्यता नाही. हवामान कोरडे राहणार असून पहाटे आणि रात्री थंडीचा कडाका वाढला आहे. तापमानात घट झाली असून नागरिकांना हुडहुडी भरत असल्याचे चित्र आहे.
advertisement
3/5
लातूर, नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यात 5 नोव्हेंबर पर्यंत ढगाळ वातावरण आणि पाऊस पहायला मिळाला. परंतु, 6 नोव्हेंबर पासून पावसाने माघार घेताच थंड वाऱ्यामुळे किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. तर उत्तर मराठवाड्यातील जालन, बीड, संभाजीनगर जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसांपासून गारठा वाढला आहे.
advertisement
4/5
आज छत्रपती संभाजीनगरमधील किमान तापमान केवळ 17 अंश सेल्सिअस पर्यंत घसरलं आहे. तर पुढील काही दिवसात पारा आणखी घसरणार असून 15 अंश सेल्सिअस पर्यंत खाली येईल. तर नांदेडमध्ये किमान तापमान 17 अंश सेल्सिअस, परभणीत 18 अंश सेल्सिअस, तर बीड जिल्ह्यात केवळ 16 अंश सेल्सिअस, धाराशिव येथे 18 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.
advertisement
5/5
दरम्यान, किमान तापमानात अचानक झालेल्या घसरणीमुळे थंडी वाढली आहे. अचानक बदललेल्या हवामानामुळे नागरिकांना सर्दी, खोकला आणि तापाची लक्षणे दिसून येऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना गरम कपडे परिधान करावे. आरोग्याची काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात येत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Weather Alert: अचानक बदलली हवा, मराठवाड्याला हुडहुडी, छ. संभाजीनगरसह 8 जिल्ह्यांचं हवामान अपडेट