TRENDING:

प्रसिद्ध डायरेक्टरचा मुलगा, हिरो बनायला गेला, झाला फ्लॉप; 13 वर्षांपासून 'गायब'

Last Updated:
Bollywood Actor : एका दिग्दर्शकाच्या मुलाला हिरो व्हायचं होतं. त्याच्या वडिलांनीच त्याला चित्रपटसृष्टीत पदार्पणाची संधी दिली. त्याच्या वडिलांचीच निर्मिती असलेल्या फिल्ममध्ये काम केलं. या फिल्ममध्ये बडे बडे स्टार होते.
advertisement
1/7
प्रसिद्ध डायरेक्टरचा मुलगा, हिरो बनायला गेला, झाला फ्लॉप; 13 वर्षांपासून 'गायब'
बॉलिवूडमध्ये कितीतरी हिरो, हिरोईल, दिग्दर्शक, निर्माते ज्यांची मुलंही फिल्म इंडस्ट्रीतच आपलं नशीब आजमावयाल उतरले. त्यापैकी काही हिट झाले तर काही फ्लॉप. असाच फ्लॉप ठरलेला एक स्टार किड, ज्याचे वडील प्रसिद्ध दिग्दर्शक, पण तो मात्र हिरो बनायला गेला आणि फ्लॉप ठरला. 13 वर्षांपासून तो गायब आहे.
advertisement
2/7
त्याची पहिली फिल्म, मल्टी स्टारर. ब्लॉकबस्टर ठरली. त्यानंतर त्याला बऱ्याच फिल्म मिळाल्या, ज्यात त्याने काम केलं. पण काही अपवाद वगळता त्याच्या एकाही चित्रपटाला लक्षणीय यश मिळालं नाही.  या अभिनेत्याला आपलं करिअर टिकवता आलं नाही. स्वत:च्या बळावर दुसरी एकही हिट फिल्म देऊ शकला नाही.
advertisement
3/7
2013 साली रिलीज झालेल्या एका फिल्ममध्ये तो शेवटचा दिसला. त्यानंतर गेल्या 13 वर्षांत तो काही दिसला नाही. त्याने अभिनय सोडला आणि फिल्मची निर्मिती सुरू केली असं, सांगितलं जातं.
advertisement
4/7
ज्या फिल्ममध्ये या अभिनेत्याने काम केलं ती फिल्म आहे.  मोहब्बतें. जी 2000 साली रिलीज झाली. आदित्य चोप्रा दिग्दर्शित आणि यश चोप्रा निर्मित या चित्रपटात अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्यासोबत शमिता शेट्टी, जुगल हंसराज, किम शर्मा, जिमी शेरगिल आणि प्रीती झंगियानी यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
advertisement
5/7
हा अभिनेता कोण हे एव्हाना तुम्हाला समजलं असेल. हो तो अभिनेता आहे उदय चोप्रा. प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते यश चोप्रा यांचा मुलगा. मोहबत्तेंनंतर तो मेरे यार की शादी है, मुझे शादी करोगी, सुपारी, नील आणि निक्की आणि प्यार इम्पॉसिबल यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसला.
advertisement
6/7
त्याने 'धूम' फिल्मच्या तिन्ही पार्टमध्ये काम केलं. तिन्ही हिट ठरले, पण उदयला त्याचा फायदा झाला नाही. चित्रपटांच्या यशाचे श्रेय मुख्य कलाकारांना मिळालं.  'धूम 3' नंतर तो उदय हळूहळू प्रसिद्धीच्या झोतातून दूर गेला. त्याला चित्रपट मिळणंही बंद झालं.
advertisement
7/7
2014 मध्ये त्याने दोन चित्रपटांची निर्मिती केली. 'ग्रेस ऑफ मोनाको' आणि 'द लाँगेस्ट वीक' या हॉलिवूड कॉमेडी-ड्रामा चित्रपटाची निर्मिती केली. हे सर्व यशराज फिल्म्सची उपकंपनी असलेल्या वायआरएफ एंटरटेनमेंटचे प्रोजेक्ट होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
प्रसिद्ध डायरेक्टरचा मुलगा, हिरो बनायला गेला, झाला फ्लॉप; 13 वर्षांपासून 'गायब'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल