दीपिकानंतर आणखी एका अभिनेत्रीला मोठा धक्का! सलग दुसऱ्या चित्रपटातून हाकललं, 'सैयारा' अभिनेत्रीला जॅकपॉट
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
नुकतंच अभिनेत्री दीपिका पादुकोणला तिच्या मागण्यांमुळे दोन मोठ्या चित्रपटांमधून बाहेर काढण्यात आलं होतं. आता तिच्या पाठोपाठ आणखी एका लोकप्रिय अभिनेत्रीला एका मोठ्या प्रोजेक्टमधून काढून टाकण्यात आलं आहे.
advertisement
1/7

मुंबई: बॉलिवूडमध्ये सध्या अभिनेत्रींसाठी चांगला काळ सुरू आहे असं वाटत असतानाच, काही धक्कादायक बातम्या येत आहेत. नुकतंच अभिनेत्री दीपिका पादुकोणला तिच्या मागण्यांमुळे दोन मोठ्या चित्रपटांमधून बाहेर काढण्यात आलं होतं.
advertisement
2/7
आता तिच्या पाठोपाठ आणखी एका लोकप्रिय अभिनेत्रीला एका मोठ्या प्रोजेक्टमधून काढून टाकण्यात आलं आहे. ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून कियारा आडवाणी आहे, ज्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
advertisement
3/7
रिपोर्ट्सनुसार, कियारा आडवाणीला एका मोठ्या चित्रपटातून बाहेर काढण्यात आलं आहे. ती ‘शक्ती शालिनी’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार होती. पण, आता तिच्या जागी ‘सैयारा’ फेम अभिनेत्री अनीत पड्डाची निवड करण्यात आली आहे, ज्यामुळे चर्चा सुरू झाली आहे.
advertisement
4/7
‘पिंकविला’च्या रिपोर्टनुसार, चित्रपटाचे निर्माते दिनेश विजन त्यांच्या चित्रपटासाठी एका नवीन चेहऱ्याच्या शोधात होते. ‘सैयारा’मध्ये अनीतचं काम त्यांना इतकं आवडलं की, त्यांनी लगेच तिला ‘शक्ती शालिनी’च्या सिक्वेलसाठी साईन करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
5/7
‘शक्ती शालिनी’ चित्रपटाचं शूटिंग या वर्षाच्या शेवटी सुरू होणार आहे. या चित्रपटासाठी कियाराला आधीच साईन करण्यात आलं होतं, पण आता तिच्या जागी अनीतला घेतलं जात आहे. यामागचं कारण म्हणजे कियारा नुकतीच आई झाली आहे आणि ती सध्या तिच्या मदरहुडचा आनंद घेत आहे.
advertisement
6/7
ही काही पहिलीच वेळ नाही की, कियाराला तिच्या गरोदरपणामुळे एखाद्या मोठ्या चित्रपटातून बाहेर काढण्यात आलं आहे. याआधी ती रणवीर सिंगसोबतच्या ‘डॉन ३’ या चित्रपटातूनही बाहेर पडली होती, आणि तिच्या जागी अभिनेत्री क्रिती सेननला घेण्यात आलं होतं.
advertisement
7/7
कामाबद्दल बोलायचं झाल्यास, कियारा आडवाणी शेवटची हृतिक रोशनसोबत ‘वॉर २’ मध्ये दिसली होती, आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई केली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
दीपिकानंतर आणखी एका अभिनेत्रीला मोठा धक्का! सलग दुसऱ्या चित्रपटातून हाकललं, 'सैयारा' अभिनेत्रीला जॅकपॉट