लागोपाठ फ्लॉप देऊनही किंचितही हललं नाही सुपरस्टारचं स्टारडम; त्या 17 फिल्म्सनं आपल्या नावे केला हा रेकॉर्ड
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
गेल्या 35 वर्षांपासून चाहत्यांचे मनोरंजन करणाऱ्या या सुपरस्टारचं वेड फक्त भारतातच नाही तर जगभरात आहे. 90 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेल्या या स्टारने 10 सुपर फ्लॉप चित्रपट दिले आहेत, परंतु त्याच्या स्टारडमला कोणीही धक्का पोहोचू शकलेलं नाही. लोक त्याला बॉक्स ऑफिसचा 'सुलतान' म्हणतात. त्याने 17 चित्रपटांसह एक विशेष विक्रम आपल्या नावे केला आहे. हा सुपरस्टार आहे बॉलिवूडचा भाईजान सलमान खान. आज सलमान खानच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याच्या विषयी काही रंजक गोष्टी.
advertisement
1/7

बॉलीवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान आज 27 डिसेंबर रोजी वाढदिवस साजरा करत आहे. सलमान खान गेल्या 35 वर्षांपासून आपल्या चित्रपटांमधून चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. आज तो 58 वर्षांचा आहे.
advertisement
2/7
1991 ते 1994 दरम्यान सलमानचे एकापाठोपाठ एक चित्रपट फ्लॉप झाले. या फ्लॉप चित्रपटांची संख्या एक-दोन नव्हे तर 10 झाली होती.
advertisement
3/7
सतत फ्लॉप ठरलेले सलमान खानचे चित्रपट म्हणजे 'सूर्यवंशी', 'जागृती', 'निश्चय', 'एक बॉय एक लडकी', 'दिल तेरा आशिक', 'चंद्रमुखी', 'चांद का तुकडा', 'अंदाज अपना अपना'. 'संगदिल सनम'. बॉलीवूडच्या 'भाईजानचे हे अयशस्वी चित्रपटच त्याच्या यशाचं कारण ठरलं. त्यानंतर एकामागून एक अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले.
advertisement
4/7
'दबंग 2' 2012 साली रिलीज झाला होता, ज्याचे कलेक्शन 155 कोटी रुपये होते. 'जय हो' सेमी-हिट असूनही 'किक'ने 116 कोटींची कमाई केली होती. 2015 मध्ये रिलीज झालेल्या 'बजरंगी भाईजान'ने 320 कोटी रुपये, त्याच वर्षी रिलीज झालेल्या 'प्रेम रतन धन पायो'ने आणि 2016 मध्ये रिलीज झालेल्या 'सुलतान'ने अनुक्रमे 210 कोटी आणि 300 कोटी रुपयांची कमाई केली होती.
advertisement
5/7
'जय हो' सेमी-हिट असूनही 'किक'ने 116 कोटींची कमाई केली होती. 2015 मध्ये रिलीज झालेल्या 'बजरंगी भाईजान'ने 320 कोटी रुपये, त्याच वर्षी रिलीज झालेल्या 'प्रेम रतन धन पायो'ने आणि 2016 मध्ये रिलीज झालेल्या 'सुलतान'ने अनुक्रमे 210 कोटी आणि 300 कोटी रुपयांची कमाई केली होती. सलमानचे एक दोन नव्हे 17 चित्रपटांनी 100 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.
advertisement
6/7
'दबंग 2' 2012 साली रिलीज झाला होता, ज्याचे कलेक्शन 155 कोटी रुपये होते. 'जय हो' सेमी-हिट असूनही 'किक'ने 116 कोटींची कमाई केली होती. 2015 मध्ये रिलीज झालेल्या 'बजरंगी भाईजान'ने 320 कोटी रुपये, त्याच वर्षी रिलीज झालेल्या 'प्रेम रतन धन पायो'ने आणि 2016 मध्ये रिलीज झालेल्या 'सुलतान'ने अनुक्रमे 210 कोटी आणि 300 कोटी रुपयांची कमाई केली होती.
advertisement
7/7
'ट्यूबलाइट' 2017 मध्ये रिलीज झाला होता, परंतु कमाईच्या बाबतीत तो सरासरी सिद्ध झाला होता. या चित्रपटाने 119 कोटींची कमाई केली होती. 'टायगर जिंदा है' आणि 'रेस 3'ने सरासरी असूनही 166 कोटींची कमाई केली होती. 2019 मध्ये सलमान खानच्या 'दबंग 3' ने 146 कोटी रुपयांची कमाई केली होती, तर 'भारत'चे कलेक्शन 211 कोटी रुपये होते. 2023 मध्ये रिलीज झालेला 'किसी का भाई किसी की जान' 110 कोटी रुपयांच्या कलेक्शनसह सरासरी ठरला. त्याचवेळी या वर्षी रिलीज झालेल्या 'टायगर 3' ने भारतात 285 कोटींहून अधिक कमाई केली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
लागोपाठ फ्लॉप देऊनही किंचितही हललं नाही सुपरस्टारचं स्टारडम; त्या 17 फिल्म्सनं आपल्या नावे केला हा रेकॉर्ड