TRENDING:

पती नव्हे हैवान! 30 वर्ष नवऱ्याचा मार खात राहिली सुपरस्टार अभिनेत्री, जीवाशी येताच केलं असं काही... कोण आहे ती?

Last Updated:
Actress Life Ruined : पडद्यावर प्रेमळ आयुष्य जगणाऱ्या या अभिनेत्रीला खऱ्या आयुष्यात मात्र तब्बल ३० वर्षे एका भयानक छळाला सामोरं जावं लागलं.
advertisement
1/9
पती नव्हे हैवान! 30 वर्ष नवऱ्याचा मार खात राहिली सुपरस्टार अभिनेत्री
मुंबई: बॉलिवूडमध्ये आपल्या पहिल्याच चित्रपटाने स्टारडम मिळवणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत रती अग्निहोत्री यांचे नाव आजही आदराने घेतलं जातं. पण, पडद्यावर प्रेमळ आयुष्य जगणाऱ्या या अभिनेत्रीला खऱ्या आयुष्यात मात्र तब्बल ३० वर्षे एका भयानक छळाला सामोरं जावं लागलं.
advertisement
2/9
ज्या पतीवर तिने भरवसा ठेवला, तोच तिच्यासाठी हैवान ठरला. अखेर जीव वाचवण्यासाठी २०१९ मध्ये त्यांनी थेट पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
advertisement
3/9
उत्तर प्रदेशातील बरेलीच्या एका पारंपरिक कुटुंबात जन्मलेल्या रती अग्निहोत्रींनी वयाच्या १६ व्या वर्षीच अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवलं. १९७९ मध्ये पदार्पण करताच त्या रातोरात स्टार बनल्या. ‘एक दूजे के लिए’ या चित्रपटाने तर त्यांना यशाच्या शिखरावर नेऊन ठेवलं.
advertisement
4/9
करिअर ऐन भरात असताना, रती यांनी १९८५ मध्ये व्यावसायिक आणि आर्किटेक्ट अनिल विरवानी यांच्याशी लग्न केलं. विशेष म्हणजे, रती अग्निहोत्रीच्या आई-वडिलांचा या नात्याला विरोध होता, पण त्यांनी कोणाचंही न ऐकता अनिलला डेट करून लग्न केलं. सासरच्यांच्या दबावामुळे त्यांना अभिनयाची दुनियाही सोडावी लागली.
advertisement
5/9
रती अग्निहोत्री यांच्यासाठी लग्नानंतरचं आयुष्य नरकाहून वाईट ठरलं. लग्नाच्या पहिल्या वर्षापासूनच पतीने त्यांना मारहाण आणि शारीरिक अत्याचार करायला सुरुवात केली. मुलगा तनुज जन्माला आल्यावर परिस्थिती सुधारेल, असं त्यांना वाटलं होतं, पण तसं झालं नाही. मारहाणीचं हे सत्र तब्बल ३० वर्षे रोजच सुरू राहिलं.
advertisement
6/9
२०१५ मध्ये त्यांनी अखेर पतीचं घर सोडण्याचा निर्णय घेतला. ‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, “मी विचार केला, मी आता ५४ वर्षांची आहे आणि दिवसेंदिवस कमजोर होत जाणार. एक दिवस मार खाऊन माझा जीव जाईल.”
advertisement
7/9
घरातून निघाल्यावर त्यांनी पती अनिल विरोधात ‘घरगुती हिंसाचाराचा’ आणि ‘जीवे मारण्याचा प्रयत्न’ केल्याचा गंभीर गुन्हा दाखल केला.
advertisement
8/9
रती इतकी वर्षं गप्प का बसल्या? यावर त्यांनी सांगितलं की, “माझी सर्वात मोठी प्रायोरिटी माझा मुलगा तनुज होता. त्याच्यासाठी मी ३० वर्षांचा हा सगळा त्रास सहन केला. मला माझ्या लग्नाच्या पावित्र्यावर विश्वास होता.” ज्या रात्री पतीने त्यांना मारलं, त्याच रात्री त्या घर सोडून निघून गेल्या.
advertisement
9/9
मुलाला सांगितल्यावर त्यानेही आईला ‘जे योग्य वाटेल ते कर’ असा पाठिंबा दिला. मात्र, नंतरच्या काळात, मुलगा तनुजच्या भवितव्यासाठी दोघांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
पती नव्हे हैवान! 30 वर्ष नवऱ्याचा मार खात राहिली सुपरस्टार अभिनेत्री, जीवाशी येताच केलं असं काही... कोण आहे ती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल