TRENDING:

'फक्त त्याला मी नको होते, म्हणून मला...', 'तुला पाहते रे' फेम गायत्री दातारला मराठी फिल्म करताना आला भयानक अनुभव

Last Updated:
Gayatri Datar : मालिका आणि रिअ‍ॅलिटी शोमध्ये यशस्वी ठरलेली गायत्री मराठी चित्रपटांमध्ये मात्र फारशी दिसत नाही. यावर बोलताना गायत्रीने तिच्यासोबत घडलेला एक धक्कादायक अनुभव सांगितला, ज्यामुळे ती पुरती हादरली होती.
advertisement
1/9
'तुला पाहते रे' फेम गायत्री दातारला मराठी फिल्म करताना आला भयानक अनुभव
मुंबई: ‘तुला पाहते रे’ या गाजलेल्या मालिकेतून घराघरात पोहोचलेली आणि आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांची लाडकी बनलेली अभिनेत्री गायत्री दातार नेहमीच चर्चेत असते. मालिका आणि रिअ‍ॅलिटी शोमध्ये यशस्वी ठरलेली गायत्री मराठी चित्रपटांमध्ये मात्र फारशी दिसत नाही.
advertisement
2/9
याच प्रश्नावर बोलताना गायत्रीने नुकताच तिच्यासोबत घडलेला एक धक्कादायक आणि हृदयद्रावक अनुभव सांगितला, ज्यामुळे ती पुरती हादरली होती.
advertisement
3/9
‘मुक्कामपोस्ट मनोरंजन’ पॉडकास्टमध्ये बोलताना गायत्रीने तिच्या मनातली खंत व्यक्त केली. ती म्हणाली, “सिनेमापासून लांब का आहे? हा प्रश्न मलाही पडला आहे. माझा अनुभव असा आहे की, तोंडापर्यंत घास येतो, पण तसाच जातो.”
advertisement
4/9
गायत्रीने एका मोठ्या प्रोजेक्टबद्दल सांगितले, ज्याचं शूटिंग कोरोनाच्या आधी लंडनला होणार होतं. या चित्रपटासाठी तिने खूप तयारी केली होती.
advertisement
5/9
ती म्हणाली, “मी फिल्म साईन केली होती, रिहर्सल झाली, पोस्टर फोटोशूट झालं, मला ॲडव्हान्स पैसेही आले होते. लंडनचं तिकीट आलं, व्हिसा झाला… सगळं काही सेट होतं! मी बॅग भरून तयार होते, मित्रांचा निरोप घेऊन निघणार इतक्यात मेसेज आला: ‘थांब, तिथे लॉकडाऊन लागला आहे!’”
advertisement
6/9
सुरुवातीला हा लॉकडाऊन १५ दिवसांचा असेल असं सांगण्यात आलं. पण, तो सिनेमा पुढेच ढकलला गेला. काही काळातच परिस्थिती इतकी बिघडली की, चित्रपटाचा फायनान्सरच प्रोजेक्टमधून बाहेर पडला.
advertisement
7/9
नवीन फायनान्सर शोधले जात असताना, काही महिन्यांनी एक फायनान्सर मिळाला. पण, त्याने एक मोठी अट घातली. गायत्री सांगते, “त्याला इतर सर्व कास्ट चालणार होती, पण त्याला मुख्य अभिनेत्री म्हणून मी नको होते! फक्त एका व्यक्तीला मी नको आहे, म्हणून मला त्या सिनेमातून काढून टाकण्यात आलं!”
advertisement
8/9
या घटनेमुळे गायत्रीला खूप मोठा धक्का बसला. “मी अक्षरशः कोसळले होते,” असं ती सांगते. मेहनत कमी पडली म्हणून नाही, तर एका तिसऱ्या व्यक्तीच्या इच्छेमुळे तिच्या हातातून एवढा मोठा सिनेमा गेला.
advertisement
9/9
ती म्हणाली की, या घटनेमुळे तिचे १५-२० दिवस खूप वाईट गेले. या इंडस्ट्रीत मेहनत करूनही गोष्टी आपल्या हातात नसतात, हे तिला पहिल्यांदाच अनुभवायला मिळालं. यानंतरही काही सिनेमांबाबत अशाच अडचणी आल्याचं तिने सांगितलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'फक्त त्याला मी नको होते, म्हणून मला...', 'तुला पाहते रे' फेम गायत्री दातारला मराठी फिल्म करताना आला भयानक अनुभव
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल