TRENDING:

'वागळे'च्या लेकीचे 'सनई चौघडे'! सखी आता 'शर्वरी परब', लवकरच होणार लग्न

Last Updated:
'वागळे की दुनिया' नंतर मराठी मालिकेत सखीची एन्ट्री झाली आहे. काय असणार आहे तिची भूमिका?
advertisement
1/7
'वागळे'च्या लेकीचे 'सनई चौघडे'! सखी आता 'शर्वरी परब', लवकरच होणार लग्न
टेलिव्हिजनच्या काही हिट मालिकांपैकी एक मालिका म्हणजे वागळे की दुनिया. या मालिकेनं एकदा नाही तर दोन वेळा प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. या मालिकेतील वागळेची मुलगी म्हणजे सखीचं आता प्रमोशनल झालं आहे.
advertisement
2/7
सखी म्हणजेच अभिनेत्री तिन्मयी साळवी आता नव्या मराठी मालिकेत दिसणार आहे. सनई चौघडे या मालिकेत सखीची एन्ट्री झाली आहे. पाच वर्षांनी सखी मराठी मालिकेत दिसणार आहे.
advertisement
3/7
‘सनई चौघडे’ मालिकेतून अभिनेत्री चिन्मयी साळवी एका नवीन भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. ‘शर्वरी परब’ ही तिची व्यक्तिरेखा एकदम बेधडक आणि बिनधास्त आहे. या भूमिकेबद्दल, ऑडिशन प्रक्रियेबद्दल, तयारी, सहकलाकार आणि त्याच्या अभिनय प्रवासाबद्दल चिन्मयीने मनमोकळ्या गप्पा मारल्या.
advertisement
4/7
चिन्मयी म्हणाली, "शर्वरी या व्यक्तिरेखेसाठी जेव्हा मला कॉल आला तेव्हा माझा आनंद गगनात मावेनासा झाला. 'वागळे की दुनिया' ही हिंदी मालिका तब्बल 5 वर्ष केल्यानंतर मला शर्वरीची भूमिकेसाठी कॉल आला. मराठी मालिकेत काम करण्याची संधी मिळाली यासाठी स्वतःला खूप भाग्यवान समजते."
advertisement
5/7
"माझी इच्छा होती की मला मराठी मालिका करायला मिळावी, ज्यामधली माझी भूमिका प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहावी. आणि स्वामींनी माझी प्रार्थना ऐकली. मालिकेत शर्वरी आणि जय हे खूप विरुद्ध करेक्टर असणार आहेत. जेव्हा हे दोन्ही करेक्टर एकमेकांच्या समोर येतील, तेव्हा काय धुमाकूळ होणार आहे हे बघण्यासारखं असेल."
advertisement
6/7
चिन्मयी पुढे म्हणाली, "शर्वरीच्या भूमिकेची तयारी करायला मला फारसं काही करावं लागलं नाही, कारण मी आणि शर्वरी मुळात खूप सारख्याच आहोत असं म्हणायला हरकत नाही. मी सुद्धा मालिकेतील शर्वरीसारखीच मस्तीखोर, बडबडी आणि नौटंकी आहे. मला ड्रामा करायला, माझ्या कुटुंबाची काळजी घ्यायला आणि त्यांच्यासाठी काहीही करायला नेहमीच आवडतं."
advertisement
7/7
"खास तयारी सांगायची झाली तर मी शर्वरीच्या करेक्टरसाठी स्कूटी चालवायला शिकले. कारण ती आपल्या आईला टिफिन व्यवसायात मदत करण्यासाठी टिफिन डिलिव्हरीसाठी स्कूटीवरून जाते. मला आधी स्कूटी चालवायला भीती वाटायची, पण शर्वरीची भूमिका लक्षात घेऊन मी स्कूटी शिकले. आणि आता मी गर्दीतसुद्धा स्कूटी चालवू शकते, याचा मला खूप आनंद आहे."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'वागळे'च्या लेकीचे 'सनई चौघडे'! सखी आता 'शर्वरी परब', लवकरच होणार लग्न
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल