TRENDING:

CM चा मुलगा, 14 वर्षी केला डेब्यू; 110 सिनेमांचा हिरो, नावावर आहे वर्ल्ड बुक रेकॉर्ड

Last Updated:
CM's Superstar Son: अनेक राजकीय मंडळींची मुलं अभिनय क्षेत्रात, सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. असाच एक अभिनेता जो एका मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे. त्याने वयाच्या 14 व्या वर्षी अभिनयात डेब्यू केला. तब्बल 50 वर्ष त्यांची अभिनय कारकीर्द सुरू असून त्याने आतापर्यंत 100 हून अधिक सिनेमांत काम केलंय. आता त्याचं वयही झालं पण त्याची क्रेझ काही कमी झालेली नाही. 
advertisement
1/8
CM चा मुलगा, 14 वर्षी केला डेब्यू; 110 सिनेमांचा हिरो, नावावर वर्ल्ड बुक रेकॉर्ड
दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास मोठा आहे. अनेक कलाकार आहे आणि गेले. जे टिकून राहिले त्यांच्यावर प्रेक्षकांनीही मनापासून प्रेम केलं.  रजनीकांत, मामूटी आणि कमल हासन ही आजही प्रेक्षकांचे तितकेच फेव्हरेट आहेत. आपण ज्या अभिनेत्याविषयी बोलतोय तो अभिनेता एका मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे. 
advertisement
2/8
दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात असा एक स्टार आहे ज्याने त्याच्या 50 वर्षांच्या कारकिर्दीत ते कायम प्रमुख नायकाच्याच भूमिकेत दिसले.  आंध्र प्रदेशचे सुपरस्टार आणि मुख्यमंत्री एन.टी. रामाराव यांचा सहावा मुलगा नंदमुरी बालकृष्ण यांच्याविषयी आपण बोलत आहोत.  
advertisement
3/8
1974 साली 'तत्तम्मा कला' या चित्रपटातून नंदमुरी यांनी डेब्यू केला. त्यांनी आतापर्यंत 109 हून अधिक सिनेमांत काम केलं आहे. आजही त्यांचे सिनेमे रिलीज होतोत आणि प्रेक्षकांकडून त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो.  
advertisement
4/8
नंदमुरी बालकृष्ण यांना इंडस्ट्रीत 'बलैया' म्हणून ओळखलं जातं.  तेलुगू चित्रपटसृष्टीत त्यांचा एक मजबूत चाहता वर्ग आहे. वयाच्या 65 व्या वर्षीही ते चित्रपटांमध्ये सक्रिय आहेत.  ते केवळ एक अभिनेताच नाहीत तर आंध्र प्रदेशातील हिंदूपूरचे खासदार देखील आहेत. 
advertisement
5/8
त्यांच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून बालय्या यांनी एनटीआर मुख्यमंत्री असताना आणि त्यांच्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यांनी कधीही मुख्य भूमिकेशिवाय इतर कोणतीही भूमिका स्वीकारली नाही.
advertisement
6/8
50 वर्षे सिनेमाचा प्रमुख नायक म्हणून दिलेल्या बालकृष्ण यांचं नाव वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलं. वयाच्या 65 व्या वर्षीही बालकृष्ण तरुण अभिनेत्यांसारखे मोठ्या स्क्रिनवर एन्ट्री घेतात आणि सिनेमा सुपरहिट करतात. 
advertisement
7/8
त्यांचा अखंड 2 हा बालकृष्ण यांचा 110 वा सिनेमा काही दिवसांत रिलीज होणार आहे. सिनेमाच्या प्रमोशनसाठी चेन्नईला आलेले बालकृष्ण म्हणाले, "मद्रास माझे जन्मस्थान आहे, तेलंगणा माझे कार्यस्थळ आहे आणि आंध्र माझ्या आत्म्याची भूमी आहे. मी 50 वर्षांपासून चित्रपटसृष्टीत आहे. मी अजूनही हिरो म्हणून काम करत आहे. मी सलग चार हिट चित्रपट दिले आहेत."
advertisement
8/8
 बालय्या गेल्या 50 वर्षांपासून हिरोची भूमिका साकारली.  पहिल्यांदाच त्यांनी तमिळ चित्रपटात छोटी भूमिका साकारण्यास होकार दिला. रजनीकांत यांच्या 'जैलर 2' ते पोलीस अधिकाऱ्याची भूमिकेत दिसणार असल्याचं बोललं जात आहे. या छोट्या रोलसाठी त्यांनी मोठी फी आकारली आहे.  
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
CM चा मुलगा, 14 वर्षी केला डेब्यू; 110 सिनेमांचा हिरो, नावावर आहे वर्ल्ड बुक रेकॉर्ड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल