TRENDING:

Dashavatar Movie : फक्त दशावतार, दशावतार आणि दशावतारच! 'कांतारा'ला पुरून उतरतोय; सकाळी 7:30 ते रात्री 11:55 हाऊसफुल्ल

Last Updated:
Dashavatar Movie : 'कांतारा चॅप्टर 1' या साऊथ सिनेमाला मराठमोळा 'दशावतार' हा सिनेमा पुरून उतरतोय. सिनेमानं दमदार सहाव्या आठवड्यात पदार्पण केलं आहे.
advertisement
1/9
'कांतारा'ला पुरून उरतोय 'दशावतार', सकाळी 7:30 ते रात्री 11:55 हाऊसफुल्ल शो!
मागील महिन्याभरापासून बॉक्स ऑफिसवर दशावतार या मराठी सिनेमाचा बोलबाला पाहायला मिळतोय. कोकणातील अस्सल मातीत तयार झालेला दशावतार हा सिनेमा हिंदी सिनेमांना काँटे की टक्कर देतोय.
advertisement
2/9
सिनेमा रिलीज झाल्यापासून हाऊसफुल्ल असल्याचं पाहायला मिळतंय. सिनेमाचं दमदार कमाई करण्यात यश मिळवलंय पण त्याचबरोबर एका महत्त्वाच्या विषयावर भाष्य केलं.
advertisement
3/9
दशावतार या सिनेमानं सहाव्या आठवड्यात पदार्पण केलं आहे. प्रेक्षकांनी दिलेल्या भरगोस प्रतिसादाबद्दल सिनेमाचे दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. इतकंच नाही तर सकाळी 7:30 ते रात्री 11:55 चे शो हाऊसफुल्ल असल्याचं देखील सांगितलं.
advertisement
4/9
सुबोध खानोलकर आणि दशावतारच्या टीमनं खास पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलंय, "दशावतारचा आज सहावा आठवडा सुरु झाला. आजही महाराष्ट्रातल्या अनेक चित्रपटगृहांमध्ये अनेक शोज हाऊसफुल आहेत."
advertisement
5/9
"जगभरात अजूनही शोज लागत आहेत, लोक त्याला प्रतिसाद देत आहेत. खऱ्या अर्थाने लोकाश्रय लाभलेला हा चित्रपट ठरलाय. त्यातल्या गुणदोषांसकट सामान्य प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर घेतलंय, हृदयात स्थान दिलंय."
advertisement
6/9
त्यांनी पुढे लिहिलंय, "कोणा एकाचं हे यश नाहीये, आमच्या 250 जणांच्या टिमने प्रचंड मेहनत घेऊन ते कमवलंय! झी स्टुडियोच्या टिमने हा चित्रपट सर्वदूर पोहोचवून त्याला सामान्य प्रेक्षकांपुढे आणलंय."
advertisement
7/9
"महाराष्ट्रभरातल्या चित्रपटगृह मालकांनी, मॅनेजर्सनी, तिकिट तपासनीसांनी आणि तिथल्या सफाई कामगारांनी सुद्धा प्रेक्षकांना हा चित्रपट बघायला मिळावा ह्यासाठी दिवस रात्र काम केलंय."
advertisement
8/9
"प्रेक्षकांनी तर सकाळी 7:30 पासून ते रात्री 11:55 पर्यंतचे शोज फुल करुन दाखवून त्यांचं प्रेम दाखवलंय. साखळीतल्या पहिल्या माणसापासून ते शेवटच्या माणसापर्यंत साऱ्यांनी प्रामाणिकपणे केलेल्या मेहनतीचं हे फळ आहे."
advertisement
9/9
"हे सगळं जुकून येणं दुर्लभ असतं. जे 'दशावतार' ला साध्य झालंय! आमच्याच नाही तर प्रामाणिकपणे घडणाऱ्या प्रत्येकच चित्रपटाला असं यश लाभो हीच इच्छा!"
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Dashavatar Movie : फक्त दशावतार, दशावतार आणि दशावतारच! 'कांतारा'ला पुरून उतरतोय; सकाळी 7:30 ते रात्री 11:55 हाऊसफुल्ल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल