Akshaye Khanna: बॉलिवूडचा धुरंधर हिरो! अक्षय खन्नाने रिजेक्ट केल्या 4 फिल्म्स; कारण होतं पहिलं अक्षर
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Akshaye Khanna Rejected Films: अक्षय खन्ना जेवढा कॅमेऱ्यासमोर 'धुरंधर' आहे, तितकाच तो चित्रपटांची निवड करण्यातही प्रचंड चाणाक्ष आहे.
advertisement
1/10

मुंबई: सध्या सोशल मीडियापासून ते गल्लीबोळातील चर्चेपर्यंत एकच नाव गाजतंय, अक्षय खन्ना! 'धुरंधर' चित्रपटातील 'रहमान डकैत' ही भूमिका त्याने अशा काही पद्धतीने साकारली आहे की, भलेभले त्याचे चाहते झाले आहेत.
advertisement
2/10
गेल्या २८ वर्षांपासून इंडस्ट्रीत असलेल्या अक्षयच्या वाट्याला आज जेवढं कौतुक आता येतंय, तेवढं कदाचित आधी कधीच आलं नव्हतं. पण तुम्हाला माहितीये का? हा हिरो जेवढा कॅमेऱ्यासमोर 'धुरंधर' आहे, तितकाच तो चित्रपटांची निवड करण्यातही प्रचंड चाणाक्ष आहे.
advertisement
3/10
अक्षय खन्नाच्या करिअरचा एक अत्यंत विचित्र योगायोग समोर आला आहे. त्याने त्याच्या २८ वर्षांच्या करिअरमध्ये ४० पेक्षा जास्त सिनेमे केले, पण त्याच्या फिल्मोग्राफीमध्ये 'K' अक्षरावरून नाव सुरू होणारा एकही सिनेमा नाही. हा केवळ योगायोग नाही, तर त्याने 'K' अक्षराचे असे ४ सिनेमे नाकारले, जे नंतर बॉक्स ऑफिसवर चांगलेच आपटले.
advertisement
4/10
अक्षय खन्नाने स्क्रिप्ट वाचून अशा काही सिनेमांना लाथ मारली, ज्यांच्याकडे पाहून तो चुकीचा निर्णय घेतोय असं वाटलं होतं. पण त्यांच्या बॉक्स ऑफिसवरील कामगिरीने सर्वांनाच थक्क केलं.
advertisement
5/10
खाकी (२००४): राजकुमार संतोषींच्या या सिनेमात अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आणि अजय देवगण सारखे दिग्गज होते. अक्षय खन्नालाही या सिनेमाची ऑफर होती, पण त्याने चक्क नकार दिला. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जेमतेम ॲव्हरेज ठरला.
advertisement
6/10
कांटे (२००२): स्टायलिश क्राईम थ्रिलर म्हणून 'कांटे'ची मोठी हवा होती. संजय दत्त आणि सुनील शेट्टी सोबत अक्षयला एका महत्त्वाच्या रोलसाठी विचारण्यात आलं होतं. मात्र, अक्षयने यात रस दाखवला नाही आणि हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सपशेल फ्लॉप झाला.
advertisement
7/10
कुर्बान (२००९): सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या या सिनेमालाही अक्षयने 'नाही' म्हटलं होतं. पुढे हा चित्रपटही प्रेक्षकांनी नाकारला आणि तो फ्लॉपच्या यादीत गेला.
advertisement
8/10
किसना (२००५): सुभाष घई यांच्या या बिग बजेट सिनेमात अक्षय खन्नाला मुख्य भूमिका हवी होती. अक्षयने नकार दिला आणि विवेक ओबेरॉयने ती भूमिका केली. निकाल काय लागला? सिनेमा बॉक्स ऑफिसवर तोंडघशी पडला.
advertisement
9/10
अक्षय खन्नाने आपल्या करिअरची सुरुवात १९९७ मध्ये 'हिमालय पुत्र'मधून केली होती. तेव्हापासून आजवर त्याने एकही असा सिनेमा केला नाही ज्याचं नाव 'K' वरून सुरू होतं. विशेष म्हणजे, त्याने ज्या ४ सिनेमांना नाकारलं, त्यापैकी ३ सिनेमे फ्लॉप ठरले. यावरून अक्षय खन्नाचं गट फीलिंग किती स्ट्राँग आहे, हेच दिसून येतं.
advertisement
10/10
आज 'धुरंधर'च्या निमित्ताने त्याने पुन्हा एकदा सिद्ध केलंय की, तो भलेही मोजके सिनेमे करेल, पण जेव्हा पडद्यावर येईल तेव्हा फक्त त्याचाच बोलबाला असेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Akshaye Khanna: बॉलिवूडचा धुरंधर हिरो! अक्षय खन्नाने रिजेक्ट केल्या 4 फिल्म्स; कारण होतं पहिलं अक्षर