TRENDING:

Akshaye Khanna: 'रहमान डकैत'साठी कशी झाली अक्षय खन्नाची निवड? एक गोष्ट ठरली X फॅक्टर! कास्टिंग डायरेक्टरने सीक्रेट सांगितलं

Last Updated:
Akshaye Khanna Casting for Dhurandhar: प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबडा यांनी नुकत्याच एका मुलाखतीत अक्षयच्या 'धुरंधर'साठीच्या कास्टिंगबद्दल मोठा खुलासा केला आहे.
advertisement
1/8
'रहमान डकैत'साठी कशी झाली अक्षय खन्नाची निवड? एक गोष्ट ठरली X फॅक्टर!
मुंबई: २०२५ सालाचा शेवट एखादा चित्रपट इतका धडाकेबाज करेल, असं कोणालाही वाटलं नव्हतं. पण आदित्य धर यांच्या 'धुरंधर' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जे वादळ आणलंय, त्याने बॉलिवूडचे सर्व जुने रेकॉर्ड्स मोडीत काढले आहेत.
advertisement
2/8
रणवीर सिंग, संजय दत्त, आर. माधवन आणि अर्जुन रामपाल यांसारखी तगडी फौज असूनही, सध्या एकाच नावाची सर्वाधिक चर्चा आहे, ते नाव म्हणजे अक्षय खन्ना! ज्याने 'रहमान डकैत' साकारून प्रेक्षकांच्या काळजात धडकी भरवली आहे.
advertisement
3/8
चित्रपटाने अवघ्या १४ दिवसांत जगभरात ६४०.५६ कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. जग वेडं झालंय, पण ज्याच्या अभिनयाचे गुणगाण गायले जातायत, तो अक्षय खन्ना नेमका काय करतोय? त्याची पहिली प्रतिक्रिया आता समोर आली असून ती ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.
advertisement
4/8
एकीकडे 'धुरंधर' २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा तिसरा चित्रपट ठरला आहे आणि लवकरच तो पहिल्या क्रमांकावर झेप घेईल, अशी चिन्हे आहेत. सोशल मीडियावर अक्षय खन्नाच्या ऑराने धुमाकूळ घातला आहे. पण आश्चर्य म्हणजे, अक्षय खन्नाला या यशाचा कोणताही हँगओव्हर चढलेला नाही.
advertisement
5/8
प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबडा यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अक्षयच्या या शांततेचा उलगडा केला. मुकेश छाबडा म्हणाले, "आज सकाळीच मी अक्षयशी बोललो. जग त्याच्या अभिनयावर फिदा आहे, पण त्याला या गोष्टीचा काहीच फरक पडत नाहीये. त्याने अगदी शांतपणे फक्त इतकंच म्हटलं, 'हो, मजा आली!'"
advertisement
6/8
मुकेश छाबडांनी अक्षय खन्नाच्या कामाच्या पद्धतीबद्दल एक रंजक गोष्ट सांगितली. ते म्हणतात, "अक्षय खन्ना हा एक असा जादूगार आहे, जो स्वतःच्याच विश्वात असतो. तो सेटवर कोणाशीही फारसा बोलत नाही, आपला ऑरा जपतो आणि आपले सीन वारंवार वाचून पूर्ण तयारीनं येतो."
advertisement
7/8
ते पुढे म्हणाले, "तो खूप पिळदार शरीरयष्टी असलेला किंवा खूप उंच नट नाही, पण त्याची पर्सनॅलिटीच सगळं काही आहे. आम्हाला 'रहमान डकैत' असा हवा होता, जो दिसायला सामान्य असेल, पण त्याच्याकडे पाहताच समोरच्याला भीती वाटली पाहिजे आणि अक्षयने तेच करून दाखवलं."
advertisement
8/8
'धुरंधर' हा एका सत्य घटनेवर आधारित 'स्पाय ॲक्शन थ्रिलर' आहे. पाकिस्तानमधील कराचीच्या 'लियारी' भागात भारताच्या RAW एजंट्सनी कशा प्रकारे सीक्रेट ऑपरेशन राबवून दहशतवादी नेटवर्कचा खात्मा केला, याचे चित्रण या चित्रपटात आहे. आदित्य धर यांनी याचे दिग्दर्शन अत्यंत तांत्रिक कौशल्याने केले आहे, ज्यामुळे हा चित्रपट जागतिक स्तरावर चर्चेत आला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Akshaye Khanna: 'रहमान डकैत'साठी कशी झाली अक्षय खन्नाची निवड? एक गोष्ट ठरली X फॅक्टर! कास्टिंग डायरेक्टरने सीक्रेट सांगितलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल