'भीती वाटत होती पण...' चिकनगुनियाच्या वेदना, 81 व्या वर्षी अॅक्शन सीन्स; दिलीप प्रभावळकरांनी सांगितला कोकणातील तो थ्रील
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Dilip Prabhavalkar : अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी दशावतार या सिनेमासाठी काही ॲक्शन सीन्स शूट केलेत. वयाच्या 81व्या वर्षी ॲक्शन सीन्स शूट करणं त्यांच्यासाठी मोठा टास्क होता. त्यांनी शूटींगचा अनुभव शेअर केला आहे.
advertisement
1/8

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि अष्टपैलू अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा दशावतार हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमातून त्यांनी पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर सोडली आहे. वयाच्या 81व्या वर्षी दिलीप प्रभावळकर यांनी फक्त अभिनयच नाही तर सिनेमात ॲक्शन सीन्स देखील दिले आहेत.
advertisement
2/8
सिनेमाच्या शूटींगवेळी त्यांना चिकगुनिया झाला होता. आजाराच्या वेदना असतानाही त्यांनी बॉडी डबल न वापरता स्वत: ॲक्शन सीन्स शूट केलेत. कोकणातील शूटींगचा थ्रील त्यांनी चाहत्यांबरोबर शेअर केला आहे.
advertisement
3/8
दिलीप प्रभावळकर यांच्याबद्दल बोलताना सिनेमाचे दिग्दर्शक सुबोध खानोलकर म्हणाले, त्यांच्या वयाचा विचार करून बॉडी डबल ठेवण्याची तयारी केली होती. सेटवर बॉडी डबल सदैव उपस्थितही होते. मात्र प्रभावळकरांनी ॲक्शन सीन्स नैसर्गिक वाटावेत’ म्हणून ते मीच करणार’, असं ठाम सांगितलं आणि ते प्रत्यक्षात करूनही दाखवलं.
advertisement
4/8
दशावतार सिनेमात दिलीप प्रभावळकर यांच्यावर अरण्यातील धावपळीचे, नदीतील पोहण्याचे, अंडरवॉटर शूटींग ते अगदी एडव्हेंचर सीन्स शूट करण्यात आलेत. हे सीन कोकणातील गर्द जंगलं, तलाव आणि दुर्गम ठिकाणी शूट करण्यात आलं आहे.
advertisement
5/8
विविध प्रकारच्या वेशभूषा, आव्हानात्मक लोकेशन्स आणि नुकताच होऊन गेलेला चिकनगुनिया सारखा वेदनादायी आजार या साऱ्या अडथळ्यांवर मात करत दुर्दम्य इच्छाशक्ती आणि भूमिकेला, कथेला न्याय देण्याची प्रामाणिकता यामुळेच दिलीप प्रभावळकर यांनी हे सर्व सक्षमपणे पार पाडले आहे.
advertisement
6/8
ॲक्शन सीन्सचा अनुभव शेअर करत दिलीप प्रभावळकर म्हणाले, "दशावतारची संकल्पना आणि स्क्रिप्ट मला खूप आवडली कारण ही व्यक्तिरेखा आजवरच्या भूमिकांपेक्षा वेगळी होती. मी ती कशी पेलेन याबाबत माझ्यापेक्षा लेखक दिग्दर्शक सुबोध खानोलकरला जास्त विश्वास वाटला होता."
advertisement
7/8
"आजवरच्या माझ्या सगळ्या महत्त्वपूर्ण भूमिकांबाबत मी हेच म्हणतो की माझ्या दिग्दर्शकांना ती ती पात्रं माझ्यात दिसली. मग त्या भूमिकांना सजीव रूप देणं ही माझी जबाबदारी ठरते. ‘दशावतार’ मधील बाबुली हे पात्र विभिन्न छटा असलेलं पात्र होतं... एक कलावंत, एक बाप आणि बरंच काही. त्यामुळे मला हे जबरदस्त आव्हान वाटलं."
advertisement
8/8
दिलीप प्रभावळकर पुढे म्हणाले, "ॲक्शन सीन्स करताना थोडी भीती होती परंतु सुबोध सारख्या नव्या दिग्दर्शकाकडून बरंच नवं काही शिकता आलं. या वयात असा अनुभव घेणं हे एक वेगळं थ्रील होतं. त्यामुळे 'दशावतार' मधील भूमिका ही माझ्यासाठी अनोखी सफर आणि अविस्मरणीय आठवण आहे."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'भीती वाटत होती पण...' चिकनगुनियाच्या वेदना, 81 व्या वर्षी अॅक्शन सीन्स; दिलीप प्रभावळकरांनी सांगितला कोकणातील तो थ्रील