TRENDING:

Diwali 2025 : दिवाळी वीकेंडला फॅमिलीसोबत पाहा 'हे' कॉमेडी चित्रपट; शेवटचा पाहायला अजिबात विसरू नका

Last Updated:
Diwali 2025 Best Comedy Movies : सिनेप्रेमींना दिवाळी वीकेंड खास करायचा असेल तर ओटीटीवरील कॉमेडी चित्रपट पाहायला अजिबात विसरू नका.
advertisement
1/4
Diwali 2025 : दिवाळी वीकेंडला फॅमिलीसोबत पाहा 'हे' कॉमेडी चित्रपट
3 इडियट्स (3 Idiots) : दिवाळीत हसून-हसून वेड लावायचं असेल तर आमिर खानच्या करिअरमधला सर्वोत्कृष्ट '3 इडियट्स' हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. कॉलेज लाईफ, हसू आणि मैत्रीचं जबरदस्त मिश्रण या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. राजकुमार हिरानी यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. आयएमडीबीवर या चित्रपटाला 8.4 रेटिंग मिळाले आहे. नेटफ्लिक्स आणि प्राईम व्हिडीओवर हा चित्रपट उपलब्ध आहे.
advertisement
2/4
लूडो (Ludo) : अनुराग बसुच्या 'लूडो' चित्रपटाचाही या यादीत समावेश आहे. हा एक परफेक्ट फॅमिली ड्रामा आहे. अभिषेक बच्चन, राजकुमार राव आणि पंकज त्रिपाठी यांच्या या चित्रपटाला आयएमडीबीवर 7.6 रेटिंग मिळाले आहे. नेटफ्लिक्सवर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता.
advertisement
3/4
छिछोरे (Chhichhore) : 'छिछोरे' या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. पण हा बहुचर्चित चित्रपट पाहायचा राहुन गेलं असेल किंवा पुन्हा पाहायचा असेल तर हॉटस्टारवर तुम्ही पाहू शकता. आयएमडीबीवर या चित्रपटाला 8.3 रेटिंग मिळाले आहे.
advertisement
4/4
गोलमाल अगेन (Golmaal Again) : कॉमेडी चित्रपटांचे जर तुम्ही शौकीन असाल तर या दिवाळीत 'गोलमाल अगेन' हा चित्रपट हॉटस्टारवर पाहा. हा चित्रपट कितीही वेळा पाहिला तरी तुम्ही हसू अजिबात कंट्रोल करू शकत नाही. अजय देवगण स्टार या चित्रपटाला आयएमडीबीवर 5.0 रेटिंग मिळाली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Diwali 2025 : दिवाळी वीकेंडला फॅमिलीसोबत पाहा 'हे' कॉमेडी चित्रपट; शेवटचा पाहायला अजिबात विसरू नका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल