Diwali 2025 : Party All Night! दिवाळी पार्टीत 'ही' 5 गाणी लावाच; ऐकूनच नाचायला लागतील सगळे
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Diwali 2025 : देशभरात दिवाळीचा सण जल्लोषात साजरा केला जात आहे. दिवाळीचा उत्साह आणखी वाढविण्यासाठी बॉलिवूडची 'ही' 5 गाणी नक्की ऐका.
advertisement
1/6

गफूर-बॉलिवूड के बदमाश : 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' या सीझनमधील सर्वात धमाकेदार गाणं हे 'गफूर' हे आहे. शिल्पा राव आणि उज्ज्वल गुप्ताच्या आवाजातील हे गाणं धुमाकूळ घालत आहे. यंदाची दिवाळी दिमाखात साजरी करण्यासाठी हे गाण्य अचूक आहे.
advertisement
2/6
बिजुरिया-सनी संस्कारी की तुलसी कुमारी : सोनू निगमचा सदाबहार आवाज आणि असीस कौरने या गाण्याला चार चांद लावले आहेत. 2000 च्या दशकातील गाण्याला नवा टच देण्याचा प्रयत्न यात करण्यात आला आहे.
advertisement
3/6
इशारे तेरे - ध्वनि भानुशाली आणि गुरू रंधावा : दिवाळीचा सण या मनमोहन गाण्याव्यतिरिक्त अपूर्ण आहे. ध्वनी भानुशाली आणि गुरु रंधावा यांच्या आवाजाची जादू पाहायची असेल तर हे गाणं ऐका. सणासुदीला डान्स-फ्लोरसाठी गाणं शोधत असाल तर हे गाणं तुमच्यासाठी परफेक्ट आहे.
advertisement
4/6
टेटेमा-श्रेया घोषाल, रेवन्नी आणि नोरा फतेही : देसी आणि अफ्रोबीटचं जबरदस्त मिश्रण असलेलं हे गाणं आहे. श्रेया घोषालचा मधुर आवाज आणि नोरा फतेहीचा ग्लॅमरस तडका असलेलं हे गाणं यंदाच्या दिवाळीसाठी परफेक्ट आहे.
advertisement
5/6
वॉट झुमका-रॉकी और रानी की प्रेम कहाणी : अरिजीत सिंह आणि जोनिता गांधी यांची केमिस्ट्री असलेलं हे गाणं सर्वांच्याच पसंतीस उतरेल. वेगवेगळ्या गोष्टींचं मीश्रण या गाण्यात पाहायला मिळेल.
advertisement
6/6
गल्ला गुडिया-दिल धडकने दो : यशिता शर्मा, मनीष कुमार टिपू, फरहान अख्तर, शंकर महादेवन आणि सुखविंदर सिंह सारख्या दमदार कलाकारांनी गायलेलं हे कमाल गाणं आहे. कुटुंबियांसोबत जल्लोष करताना हे गाणं योग्य आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Diwali 2025 : Party All Night! दिवाळी पार्टीत 'ही' 5 गाणी लावाच; ऐकूनच नाचायला लागतील सगळे