Diwali Movie Releases : दिवाळीत प्रेक्षकांना मनोरंजनाचा फराळ! थिएटरमध्ये धडकणार 'हे' हिंदी-मराठी जबरदस्त चित्रपट
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Diwali Theatrical Releases : 'दिवाळी 2025'मध्ये प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन होणार आहे. ओटीटीसह थिएटरमध्येही अनेक जबरदस्त हिंदी-मराठी चित्रपट रिलीज होणार आहेत. यात हॉरर-कॉमेडीसह अनेक नाट्यमय चित्रपट रिलीज होत आहेत. सर्व वयोगटातील मंडळीना त्यांच्या आवडीच्या चित्रपटाचा आस्वाद घेता नक्कीच घेता येईल.
advertisement
1/6

महायोद्धा राम 3D : बॉलिवूड अभिनेता कुणाल कपूर आणि मौनी रॉय यांचा मायथॉलॉजिकल एपिक 'महायोद्धा राम 3D 17 ऑक्टोबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. रायजादा रोहित जयसिंह वैद यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. हा 3D चित्रपट भगवान राम यांचा राजकुमार ते धर्मासाठी लढणारा योध्दा बनण्याचा प्रवास दाखवतो. यात जिमी शेरगिल आणि गुलशन ग्रोव्हर हेदेखील आपल्या आवाजाची जादू दाखवताना दिसतील.
advertisement
2/6
थामा : बॉलिवूड स्टार आयुष्मान खुरानाचा 'थामा' हा हॉरर-कॉमेडी चित्रपट या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात रश्मिका मंदाना आयुष्मानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. 21 ऑक्टोबर रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होईल. आदित्य सरपोतदारने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
advertisement
3/6
एक दीवाने की दीवानियत : 'एक दीवाने की दिवानियत' या चित्रपटात हर्षवर्धन राणे आणि सोनम बाजवा ही जोडी दिसणार आहे. यात एक इंटेन्स प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे. मिलाप मिलन झवेरी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. पहिल्यांदाच हर्षवर्धन आणि सोनम यांची जोडी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. हा चित्रपट 21 ऑक्टोबरला सिनेमागृहात रिलीज होणार आहे.
advertisement
4/6
प्रेमाची गोष्ट 2 : सतीश राजवाडे दिग्दर्शित 'प्रेमाची गोष्ट 2' हा बहुप्रतीक्षित चित्रपट दिवाळीच्या शुभमुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. ललित प्रभाकर, ऋचा वैद्य, रिधिमा पंडित, स्वप्निल जोशी आणि भाऊ कदम अशी तगडी स्टारकास्ट असणारा हा चित्रपट आहे. 21 ऑक्टोबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रातील सिनेमागृहात प्रदर्शित होईल.
advertisement
5/6
लास्ट स्टॉप खांदा : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम श्रमेश बेटकर 'लास्ट स्टॉप खांदा' या चित्रपटाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. या चित्रपटाचं कथानकही श्रमेशने लिहिलं आहे. तर विनित परुळेकरने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. प्रेम या संकल्पनेचा एक वेगळा पदर या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
advertisement
6/6
स्मार्ट सुनबाई : एका अनोख्या, रंगेल आणि गुंतागुंतीच्या जगात घेऊन जाणारा 'स्मार्ट सुनबाई' हा चित्रपट आहे. शिवाजी दोलताडे दिग्दर्शित या चित्रपटाचा टिझर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला होता. शहरातील आधुनिक स्त्रिया आणि गावातील पारंपरिक स्त्रिया यांच्या मजेशीर जुगलबंदीने भरलेला हा सिनेमा प्रेक्षकांना चांगलच हसवणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Diwali Movie Releases : दिवाळीत प्रेक्षकांना मनोरंजनाचा फराळ! थिएटरमध्ये धडकणार 'हे' हिंदी-मराठी जबरदस्त चित्रपट