Prajakta Gaikwad: नंदीवरून एन्ट्री अन् नेटकाऱ्यांची टीका! लग्नाच्या 2 आठवड्यांनी प्राजक्ताचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Prajakta Gaikwad: प्राजक्ता गायकवाडच्या शाही विवाह सोहळ्यातील एक गोष्ट मात्र काही नेटकाऱ्यांना चांगलीच खटकली आणि त्यावर टीका सुरू झाली. अखेर प्राजक्ताने स्वतः त्या टीकेला सडेतोड उत्तर दिले आहे.
advertisement
1/8

मुंबई: मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड काही दिवसांपूर्वीच शंभूराज यांच्यासोबत विवाहबंधनात अडकली. त्यांचा हा शाही विवाहसोहळा सोशल मीडियावर चांगलाच गाजला.
advertisement
2/8
त्यांचे साखरपुडा आणि लग्न समारंभ खूपच थाटामाटात झाले. प्राजक्ताला साधे लग्न हवे असताना, लग्नाचे ठिकाण अचानक बदलले आणि हा सोहळा पुण्यामध्ये पार पडला, अशी माहिती तिने नुकत्याच एका मुलाखतीत दिली.
advertisement
3/8
पण, या सोहळ्यातील एक गोष्ट मात्र काही नेटकाऱ्यांना चांगलीच खटकली आणि त्यावर टीका सुरू झाली. अखेर प्राजक्ताने स्वतः त्या टीकेला सडेतोड उत्तर दिले आहे.
advertisement
4/8
प्राजक्ता आणि शंभूराज यांच्या लग्नानंतर पुण्यात एक भव्य शाही रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या रिसेप्शनमधील त्यांच्या एन्ट्रीने सर्वांचे लक्ष वेधले. वधू-वर एका भव्य आणि खोट्या नंदीवर बसून स्टेजपर्यंत आले.
advertisement
5/8
इतकंच नाही, तर त्यांच्यासमोर भगवान शंकराच्या वेशातील एक व्यक्ती नृत्य करत होता आणि आजूबाजूला शिवगणदेखील उपस्थित होते. काही नेटकाऱ्यांनी धार्मिक प्रतीकांचा वापर लग्नाच्या एन्ट्रीसाठी करणे खटकले आणि यावर सोशल मीडियावर टीका सुरू झाली.
advertisement
6/8
नुकतंच एका मुलाखतीत प्राजक्ताने या टीकेवर स्पष्टीकरण दिले आहे. तिने सांगितले की, पुण्यात ५ ते १० हजार लोक सहज लग्नाला येतात, पण तिला तसे लग्न करायचे नव्हते. डेस्टिनेशन वेडिंग कॅन्सल झाल्यानंतर पुण्यातील लग्नही छान झाले.
advertisement
7/8
ती 'नंदी एन्ट्री' बद्दल म्हणाली, "आमची एन्ट्री देखील स्पेशल होती. लोकांनी त्याला छान प्रतिसाद दिला, काहींना ते निगेटीव्हही वाटलं..."
advertisement
8/8
यावर स्पष्टीकरण देताना ती म्हणाली, "ज्या दिवशी लग्न असते, त्या दिवशी वर आणि वधू लक्ष्मी-नारायणाच्या रूपात असतात. त्यामुळे शिव-पार्वती विवाहसोहळ्यात असतात तसे शिवगण तिथे होते. खूपच छान असा तो देखावा होता आणि विशेष म्हणजे, ही एन्ट्री आमच्यासाठी एक सरप्राईज होती!"
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Prajakta Gaikwad: नंदीवरून एन्ट्री अन् नेटकाऱ्यांची टीका! लग्नाच्या 2 आठवड्यांनी प्राजक्ताचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर